नाशिक रोड रेल्वे स्टेशन वरील जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या छापा साडेतीन जागांचा ऐवज जप्त

नाशिक रोड रेल्वे स्टेशन वरील जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या छापा साडेतीन जागांचा ऐवज जप्त
Published on: 
रेल्वे स्थानकावरील जुगारअड्ड्यावर छापा साडेतीन लाखांचा ऐवज जप्त; १३ जणांना अटक सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १६ : नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातील जुगारअड्ड्यावर नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ पथकाने छापा मारून १३ जणांना अटक केली. कारवाईत साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हवालदार संदीप भांड आणि उत्तम पवार यांना याबाबत माहिती मिळाली होती. वरिष्ठ निरीक्षक डॉ. आंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रमीज शेख, किरण शिरसाठ, हवालदार देविदास ठाकरे, प्रदीप म्हसदे, संदीप भांड, विशाल देवरे, मिलिंद सिंग, उत्तम पवार, परदेशी, मुश्रीफ शेख, बारसे, शेखर शेख, सुनील भोसले, श्रीकांत सूर्यवंशी आणि मनीषा सरोदे यांनी सापळा लावला. कारवाईत १३ जणांना ताब्यात घेण्यात आले. सिकंदर अब्दुल सत्तार रहमान (५६, रा. घाटकोपर पूर्व, मुंबई), इस्तेखार हकीमुद्दीन अन्सारी (६५, रा. नालासोपारा पूर्व, ठाणे), अफजल लियाकत खान (४३, रा. शिवाजीनगर, मुंबई), रियाजुद्दीन अब्दुल कय्यूम मणियार (५२, रा. अंधेरी पश्चिम, मुंबई), ओंकार चंद्रकांत महाडीक (३८, रा. चिपळूण, जि. रत्नागिरी), सुनीलकुमार कालीप्रसाद चंद्रवंशी (४५, रा. मालाड पश्चिम, मुंबई), रवी जगदीश शर्मा (५९, रा.दासकोई, जि. अहमदाबाद), मोहम्मद शाहीद मेहबूब आलम शेख (५९, रा. मालाड पश्चिम, मुंबई), गुरुदत्त किशन यादव (२७, रा. छत्रपती संभाजीनगर), आरिफ रमजान खान (५२, रा. गोवंडी, मुंबई), राकेशकुमार सीताराम सिंग (५४, रा. भाईंदर पूर्व, ठाणे), कुंदनसिंग जब्बारसिंग राजपूत (५५, रा. खेतवाडी खंभाटा लेन, मुंबई), प्रदीप सुभाष अग्रवाल (४३, रा. बेलापूर रोड, ठाणे) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत. --चौकठट प्रवाशांच्या वेशात पोलिसांची कामगिरी जुगारअड्ड्याची माहिती मिळताच पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांच्या वेशात तसेच बसस्थानक, हॉटेल आणि परिसरातील अशा विविध ठिकाणी सापळा लावून जुगार खेळवला जात असल्याची खात्री केली. खात्री होताच जुगार अड्ड्यावर छापा मारून कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.