Ramadan Eid : ‘रमजान’ मुळे बाजारात दररोज लाखो रुपयांची उलाढाल; खाद्य पदार्थांबरोबरच फळांचीही कपडे

Ramadan Eid : शहरात रमजान पर्वानिमित्त विशेष बाजार गेल्या दोन आठवड्यापासून भरत आहे. या बाजारात खाद्य पदार्थांबरोबरच फळांचीही कपडे, चप्पल, बुट यांची विक्री जोमात आहे.
Traders selling food on Old Agra Road here. In the second photo, the crowd of customers at the sorbet shop
Traders selling food on Old Agra Road here. In the second photo, the crowd of customers at the sorbet shopesakal

Ramadan Eid : शहरात रमजान पर्वानिमित्त विशेष बाजार गेल्या दोन आठवड्यापासून भरत आहे. या बाजारात खाद्य पदार्थांबरोबरच फळांचीही कपडे, चप्पल, बुट यांची विक्री जोमात आहे. त्यामुळे विक्रीतून शहरात रोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. मुस्लीम बांधवांचा सर्वात मोठा सण रमजान ईद असतो. या महिन्यात प्रत्येक मुस्लीम बांधव उपवास करतात. रमजाननिमित्त अनेकांची दिनचर्या बदलते. (nashik Ramadan Eid Due to Ramadan daily turnover of lakhs of rupees in market in malegaon marathi news)

उपवास असल्यामुळे येथे फळांना विशेष मागणी असते. प्रामुख्याने टरबूज, खरबूज, चिकू, द्राक्ष, मोसंबी, पेरु तसेच काकडी यांच्या विक्रीत दुप्पटीने वाढ होते. फळ विक्रीतून रोज सुमारे २५ ते ३० लाखाची उलाढाल होते. इतर महिन्यांपेक्षा रमजान महिन्यात दुप्पटीने फळांची विक्री होते. फळांबरोबरच प्रत्येक मुस्लीम बांधव रमजान ईदसाठी नवीन कपडे खरेदी करतो. त्याचबरोबर टेलर व्यवसाय जोमात आहे.

शहरात किदवाई रोड, मोहम्मद अली रोड, गांधी मार्केट, लल्ले चौक, सरदार मार्केट या ठिकाणी कपड्यांचा बाजार भरतो. कपड्यांच्या किमतीत दरवर्षी दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होत असली तरी त्याच्या विक्रीतही कुठलीही घट होत नाही. कापड व्यवसायातून येथे महिनाभरात करोडो रुपयांची उलाढाल होत असल्याचे येथील व्यापारी सांगतात. खजूरची महिनाभरात अंदाजे शंभर टनच्या आसपास विक्री होते.

येथे भरतो विशेष बाजार

शहरातील शिकारी हॉटेल, आयशानगर चौक, बेलबाग, तीन कंदील, मोहम्मद अली रोड, भिक्कू चौक, इद्दू मुकादम चौक, जुना आग्रा रोड, आझादनगर, अख्तराबाद, राैनकाबाद, गुलशेरनगर, अलीअकबर, गोल्डननगर, सैलानी चौक यासह इतर ठिकाणी विशेष बाजार भरले जातात.

या बाजारातून फळांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. त्याचबरोबर मुंबई येथील चिकनचे खाद्यपदार्थ येथील नागरीकांना भुरळ घालत आहे. खाद्यपदार्थ घेण्यासाठी गर्दी होत आहे. फळांनंतर खाद्यपदार्थ विक्रीतही रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून येथे खाद्यपदार्थ विक्रीच्या शेकडो गाड्या लागल्या आहेत.(latest marathi news)

Traders selling food on Old Agra Road here. In the second photo, the crowd of customers at the sorbet shop
Ramadan Month : पवित्र रमजान आणि रोजाचे महत्त्व काय? मुस्लिम बांधवांसाठी का खास आहे रमजान?

खाद्यपदार्थ व दर

चिकन बर्गर २० रुपये

चिकन रोल ३०

ब्रेड बम २०

चिकनकाडी २०

रशियन कबाब १५

ब्रेड रोल २०

समोसा ६०

चिकन कटलेट २०

चिकन पालक रोल ३०

चिज रोल ३०

पहाडी रोल ३०

बर्फी कबाब ३०

शेजवान कबाब ३०

तीळ पालक कबाब ३०

Traders selling food on Old Agra Road here. In the second photo, the crowd of customers at the sorbet shop
Ramadan Eid : जीव देईन, पण देशाचे तुकडे कधीच होऊ देणार नाही; ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा

शीतपेयांना विशेष मागणी

शितपेयांमध्ये सिताफळ क्रीम, मँगो, कोकोनट, लस्सी, फालुदा, रुअबजा, ताक, सरबत, लिंबू सरबत यासह विविध शितपेयांच्या दुकानांवर खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहे. शीतपेयांमध्ये २० ते १५० रुपयांपर्यंत शीतपेय मिळतात. सर्वात महाग सीताफळ आइस्क्रीम असून सर्वात स्वस्त सरबत व लस्सी आहे. सायंकाळी उपवास सोडण्याच्या वेळी लस्सी व सरबतच्या दुकानांवर गर्दी होते.

''रमजान महिन्यात फळांच्या विक्रीत दुप्पटीने वाढ होते. यंदा टरबूज, खरबूजला मागणी जास्त आहे. टरबूज सुमारे २२ टन तर खरबूजाची पाच टन विक्री होते.''- श्‍यामकांत मालपुरे, प्रशांत ॲन्ड भगवा फ्रुट कंपनी, मालेगाव

Traders selling food on Old Agra Road here. In the second photo, the crowd of customers at the sorbet shop
Ramadan Eid : मालेगावी रमजान ईदच्या खरेदीची धूम! किदवाई रस्त्यावर गर्दी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com