Nashik Ramadan Eid : महागाईने शिरखुर्माचा गोडवा कडवटला! बाजारातील खरेदी-विक्रीवर परिणाम, खोबऱ्याच्या दरात मात्र घसरण

Nashik News : शिरखुर्मा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुकामेव्यातील काही पदार्थांचे दर दुपटीने वाढले आहे.
sheer khurma
sheer khurmaesakal

जुने नाशिक : शिरखुर्मा तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुकामेव्यातील काही पदार्थांचे दर दुपटीने वाढले आहे. वाढलेल्या महागाईने शिरखुर्माचा गोडवा कडवटला आहे. बाजारातील खरेदी-विक्रीवरही त्याचा परिणाम झाला आहे. (Nashik Ramadan Eid Inflation Sheer Khurma news)

रमजान पर्वाचा शेवटचा खंड सुरू आहे. रमजान ईदने पर्वाची सांगता होणार आहे. पर्वातील महिनाभराच्या रोजा अर्थात उपवासाची सांगता ईदच्या दिवशी शिरखुर्मा सेवन करून होत असते. त्यात खारीक (खजूर), चारोळी, पिस्ता, खोबरे, बदाम, काजू, किसमिस, अक्रोड, खसखस अशा विविध पदार्थांचा समावेश असतो.

गुरुवारी (ता. ११) रमजान ईद साजरी होण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने शिरखुर्मासाठी लागणाऱ्या सुकामेव्याची खरेदी करण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून बाजारात गर्दी केली जात आहे. दूध बाजार, चौक मंडई, बागवानपुरा अशा विविध भागांत सुक्या मेव्याची दुकाने सजली आहेत.

सुकामेव्यातील काही पदार्थांना महागाईची झळ बसली आहे. त्यांचे दर दुपटीने वाढले आहे. त्यामुळे शिरखुर्माचा गोडवा काहीसा कडवटला आहे. दुसरीकडे खोबऱ्याच्या दरात चांगलीच घसरण झाली आहे. गेल्या वर्षी २२० रुपये प्रतिकिलो विक्री होणारे खोबरे यंदा १२५ ते १५० प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. असे जरी असले तरी पिस्ता, चारोळी आणि खारीक यांचे दर दुपटीने वाढले आहे. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारे खिशाला कात्री बसली आहे.

काय आहे शिरखुर्मा

दूध आणि खोबरे, खजूर, चारोळी, काजू, बदाम, किसमिस, अक्रोड अशा विविध प्रकारच्या सुक्यामेव्याचा वापर करून तयार करण्यात आलेल्या गोड पदार्थास शिरखुर्मा म्हटले जाते. शिरखुर्मा तयार करून फतेहापठण केले जाते. त्यानंतर आप्तसंबंधीय, मित्रपरिवार एकमेकांच्या घरी जाऊन शिरखुर्माचा आस्वाद घेत असतात.  (latest marathi news)

sheer khurma
Ramadan Festival : शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी बाजारपेठ सज्ज! चारोळीचे दर गगनाला

असे आहे दर (प्रतिकिलो)

सुकामेवा प्रकार ....................... दर

खोबरे ..........................१२५ ते १५०

खजूर..........................३२०

काजू...........................८००

बदाम...........................८००

पिस्ता.......................... दोन हजार

किसमिस..........................३००

चारोळी...........................दोन हजार ८००

खसखस..........................एक हजार ६००

अंजीर............................एक हजार ६००

अक्रोड............................८००

"चारोळी, पिस्ता, खारीक यांचे दर दुपटीने वाढले आहेत. महागाईमुळे ग्राहकांची संख्या कमी आहे. आहे ते ग्राहक कमी प्रमाणात सुकामेव्याची खरेदी करत आहेत. त्याचा काहीसा परिणाम व्यवसायावर दिसून येत आहे."-युनूस तांबोळी, दुकानदार

sheer khurma
Ramadan Festival : शबे-ए-कदर निमित्त मालेगावला दुवापठण; मशिदींमध्ये मोठी गर्दी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com