Rang Panchami 2024 : रंगपंचमी खेळताय, पण सावधान...! रासायनिक रंगांनी पोहोचू शकते इजा

Nashik News : बाजारात असलेल्या रासायनिक रंगांमुळे त्वचेला आणि डोळ्यांना मोठी इजा पोहोचून आयुष्यभरासाठीचा गंभीर अधुपणाही येऊ शकतो.
Rang Panchami 2024
Rang Panchami 2024esakal

Nashik Rang Panchami 2024 : रंगपंचमी म्हटले की बालगोपाळांपासून सर्वांना रंगात रंगायला आवडते. परंतु रंगपंचमी खेळताना सावधगिरीही बाळगायला हवी. बाजारात असलेल्या रासायनिक रंगांमुळे त्वचेला आणि डोळ्यांना मोठी इजा पोहोचून आयुष्यभरासाठीचा गंभीर अधुपणाही येऊ शकतो. (Rang Panchami 2024) याबाबत त्वचारोग आणि नेत्ररोग तज्‌ज्ञांनी रासायनिक रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंग वा हळद-कुंकंवाच्या पाण्याचा वापर करून रंगपंचमी खेळण्याचे आवाहन केले आहे. (Nashik Rang Panchami 2024 news)

होळीनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. यंदा शनिवारी (ता. ३०) रंगपंचमीसाठी नाशिकमध्ये पारंपरिक रहाडी खुल्या करण्यात आल्या असून, आधुनिक पद्धतीने आता शॉवर रंगपंचमी खेळण्याचाही प्रकार रुढ होतो आहे. असे असले तरी बालगोपाळांपासून सारेच बाजारात उपलब्ध असलेले रंग एकमेकांवर लावून रंगपंचमी खेळतात. मात्र, बाजारात विक्रीसाठी असलेले रंग खरंच चांगले वा इजा पोहोचणार नाही असे असतात का, याबाबत शंकाच आहे.

बाजारात विक्रीसाठी असलेल्या रासायनिक रंगांमुळे शरीराला इजा पोहोचण्याची शक्यता अधिक असते. या रंगांमध्ये रासायनिक पदार्थांचा वापर करण्यात आलेला असतो. अलिकडे तर ऑईल पेंटचे रंग वापरले जातात. अशा रंगांमुळे त्वचेला गंभीर स्वरुपाची इजा पोहोचू शकते. तसेच असे रंग जर डोळ्यात वा तोंडावाटे पोटात गेले तर त्याचाही गंभीर त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

असे होऊ शकते

* रासायनिक रंगांमध्ये अनेक प्रकारच्या रासायनिक द्रव्यांचा वापर करण्यात आलेला असतो.

* रासायनिक रंग विषारी असण्याचीच शक्यता अधिक असते.

* या रंगांमुळे त्वचेला खाज सुटून पुरळ येण्याची शक्यता असते.

* त्वचेची ॲलर्जी असेल तर या रंगामुळे गंभीर स्वरुपाचा त्रासही होऊ शकतो

* रासायनिक रंगांमुळे केसांवर दुष्परिणाम होऊ शकतो

* असे रंग डोळ्यात गेल्यास अंधत्व वा अधुपणा येण्याची शक्यता असते

* रासायनिक रंगीत पाणी वा पिचकारीतून पाण्याच्या माऱ्यामुळे डोळ्याच्या समोरील पडद्याला इजा पोहोचण्याची शक्यता असते  (latest marathi news)

Rang Panchami 2024
Rohit Sharma Holi: लालेलाल हिटमॅन...! मुंबई इंडियन्सने शेअर केला धुळवडीचा खास Video

हे कराच

* रंगपंचमी खेळालया जाण्यापूर्वी शरीराला खोबरेल वा गोडतेल लावा

* केसांनाही तेल लावा. त्यामुळे केसांना धोका पोहोचण्याची शक्यता कमी होईल

* रंगामुळे डोळ्यांची जळजळ होत असेल तर डोळे थंड पाण्याने धुवा.

* रंगांमुळे खाज सुटणे, डोळ्यांना इजा पोहोचणे असे प्रकार घडल्यास तात्काळ नजिकच्या डॉक्टरांकडे उपचार घ्या.

* डोळ्यावर पाण्याचा मारा वा रंग जाणार नाही यासाठी चष्मा वापरावा

"रंगपंचमी खेळताना शक्यतो रासायनिक रंगांचा वापर करू नये. अन्यथा डोळ्याला गंभीर इजा पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित नंबरचा चष्मा असेल तर नंबर बदलू शकतो. पडदा खराब होऊ शकतो. वेळप्रसंगी डोळा निकामी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे चष्म्याचा वापर केल्यास धोका टाळता येऊ शकेल."

- डॉ. शशिकांत आवारे, नेत्ररोग तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय.

Rang Panchami 2024
Holi Festival 2024 : देवळ्यात पर्यायावरणपूरक होळी व धुळवड साजरी; नैसर्गिक शेती करण्याचाही दिला संदेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com