Nashik Rang Panchami : कामातून मुक्त होत अधिकारी-कर्मचारी थिरकले! पोलिस आयुक्तालयात रंगपंचमी उत्साहात

Nashik News : शहर मुख्यालयामध्ये पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवारी (ता. ३१) सकाळी शॉवर रंगपंचमी उत्साहात साजरी केली.
Police officers, personnel enjoying shower Rangpanchami in the city police headquarters premises.
Police officers, personnel enjoying shower Rangpanchami in the city police headquarters premises.esakal

नाशिक : शनिवारी (ता. ३०) शहरभर रंगपंचमी उत्साहात साजरी झाली. परंतु पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना बंदोबस्तामुळे रंगपंचमीचा आनंद लुटता आला नाही. मात्र, शहर मुख्यालयामध्ये पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवारी (ता. ३१) सकाळी शॉवर रंगपंचमी उत्साहात साजरी केली. हिंदी-मराठी गीतांच्या चालीवर पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी झिंगाट डान्स करीत कामाच्या तणावातून काही वेळ निवांत होत रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला. (Nashik Rang Panchami 2024 at Police Commissionerate news)

नाशिककरांनी शनिवारी (ता. ३०) रंगपंचमी उत्साहात साजरी केली. त्याचवेळी रंगपंचमीचा बेरंग होऊ नये म्हणून शहरभर पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला होता. यामुळे पोलिसांना रंगपंचमीचा आनंद घेता आला नव्हता.

परंतु पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या पुढाकारातून रविवारी (ता. ३१) सकाळी मुख्यालयातील भीष्मराज बाम सभागृहासमोर शॉवर उभारण्यात येऊन रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, उपायुक्त मोनिका राऊत, उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रंगपंचमीचा आनंद लुटला.  (latest marathi news)

Police officers, personnel enjoying shower Rangpanchami in the city police headquarters premises.
Bhandara-Gondiya Loksabha: भंडारा-गोंदिया मतदारसंघात मतपत्रिकेवर २५ वर्षांनंतर दिसणार पंजा, 'या' ३ पक्षांत तिरंगी लढत

झिंगाट डान्सवर पोलिस अधिकारी व कर्मचारी थिरकले. सततचा बंदोबस्त, गुन्ह्याचा तपास अशी कामे काही वेळेसाठी बाजुला सारून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रंगाच्या पाण्यात न्हाऊन घेत रंगपंचमीचा आनंद लुटला. अधिकारी-कर्मचाऱ्यांसह मुख्यालयातील पोलिस कुटुंबीय, चिमुकलेही यावेळी सहभागी होत रंगपंचमीचा आनंद लुटला.

लोकाभिमुख पोलिसिंगवर भर

पोलिस आयुक्तालय हद्दीमध्‌ये विविध उपक्रमांद्वारे पोलिसिंग करण्याचा प्रयत्न आहे. पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारदारास पोलिसांकडून मदत मिळालीच पाहिजे. त्यासाठीच लोकाभिमुख पोलिसिंगचा उपक्रम हाती घेतल्याचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यावेळी सांगितले.

Police officers, personnel enjoying shower Rangpanchami in the city police headquarters premises.
Nandurbar Lok Sabha: वडिलांनंतर मुलगा आजमावतोय आता लोकसभा उमेदवारीतून नशीब! डॉ. गावित व ॲड. पाडवींना राजकीय ‘श्रीगणेशा’ची संधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com