Nashik : राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानात नाशिक राज्यात प्रथम! ZP CEO आशिमा यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव

certificate
certificateesakal

Nashik : राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात सर्व उपक्रमांमध्ये जिल्हा परिषदेने राज्यात सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट कामकाज केले आहे.

राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानात सर्वोत्कृष्ट कामगिरीबाबत राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला. (Nashik rank First in state of National Gram Swaraj Campaign ZP CEO Ashima mittal felicitated with certificate Nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

certificate
LIVE Marathi News Updates: निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या भेटीला नितीश कुमार

पंचायत राज संस्थामधील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना त्यांचे हक्क कर्तव्य व जबाबदाऱ्या तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, यासाठी राज्य कृती आराखड्यांतर्गत प्रशिक्षण व क्षमता बांधणीसाठी हा कार्यक्रम शासनाच्या वतीने राबवला जातो.

या कार्यक्रमांतर्गत जिल्हा पातळीवर एकूण आठ प्रकारचे उपक्रम राबवले जातात. यामध्ये जीपीडीपी व एसडीजी प्रशिक्षण, ट्रेनिंग मॅनेजमेंट सिस्टीमवरील नोंदी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचे प्रशिक्षण, ग्रामसेवक प्रशिक्षण, राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान निधी खर्च,

ग्रामपंचायत कार्यालय निधी बांधकाम, ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती, सीएससी कॉमन सर्विस सेंटर उद्दिष्टपूर्ती अशा आठ उपक्रमांमध्ये नाशिक जिल्हा परिषदेने राज्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे.

या संदर्भात राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी आशिमा मित्तल यांचा गौरव केला आहे, अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

certificate
ZP Employees Transfer : जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांचा मार्ग खुला; राज्य शासनाकडून पत्र प्राप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com