
नाशिक : सार्वजनिक स्वरुपाच्या पायाभूत सुविधा जसे की, रस्ते, रेल्वे, विमान सेवा, पाणी व्यवस्था यासंदर्भातील सुविधा सक्षम असल्यास रिअल इस्टेटचा व्यवसाय तेजीत येतो असे म्हणता. नाशिकच्या संदर्भात पायाभूत सुविधांचा वेग मंदावला असला तरी रिअल इस्टेट मात्र तेजीत राहिल्याचे वर्षभरात दिसून आले. स्थिर सरकार व भविष्यात येऊ घातलेल्या प्रकल्पांमुळे येत्या काळात तेजी कायम राहील असे दिसते.