
नाशिक : विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेच्या नोंदणीला सुरवात होत आहे. विधी शाखेतील तीन वर्षे कालावधीचा एलएलबी अभ्यासक्रम तसेच एमसीए या संगणकशास्त्रातील अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा नोंदणीला सुरवात झाली आहे. पात्रताधारक विद्यार्थ्यांना जानेवारीपर्यंत नोंदणी करता येईल. सीईटी सेलतर्फे सीईटी परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रवेशासाठी मार्च महिन्यापासून सीईटी परीक्षांचे आयोजन केले जाणार आहे.