
नाशिक : माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात जनजागृतीची प्रभावी साधने आणि कर्तव्याविषयी सतर्कता वाढल्याने वर्षभरात जिल्ह्यात एक लाख ८४ हजार ५२९ मुलींनी मतदारयादीत नाव सामविष्ट केले आहे. जिल्ह्यात मतदारांच्या लिंगगुणोत्तर प्रमाणात वाढ झाली असून, दर हजार पुरुष मतदारांमागे जिल्ह्यात ९३७ महिला मतदारांची नोंद आहे. गेल्या वर्षी १ जानेवारीला हे प्रमाण केवळ ९१८ इतके होते.केंद्राने लोकसभा-राज्यसभा तसेच विधानसभेमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण बहाल केले आहे.