
नाशिक रोड : शेतकऱ्यांना कांद्यासारखा नाशवंत माल थेट रेल्वेने पाठविण्याची सुविधा देण्यासाठी भुसावळ विभागाने शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे सुरू केली आहे. या रेल्वेत १० बोगी शेतमालासाठी (प्रत्येकी २३ टन) आणि १० सामान्य डबे जोडण्यात आले आहेत. ही किसान समृद्धी एक्स्प्रेस १७ ऑक्टोबरापासून सुरू झाली असून, दर शनिवारी धावत आहे. जबलपूर, सतना, प्रयागराज, आरा, बक्सर आणि दानापूर या शहरांत जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल वेळेवर पोहोचविण्यासाठी मोठी सोय झाली आहे. (relief given to farmers by Kisan Express will continue till November 30 )