
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळा साधू, संत व भाविकांचा असतो. तसाच विकासाचीदेखील पर्वणी यानिमित्ताने साधता येते. त्यामुळे कुंभमेळ्याचा आराखडा तयार करताना आमदार, खासदारांचादेखील सहभाग असावा म्हणून विकासकामांबाबत मार्गदर्शन मागविण्यासाठी आयुक्त मनिषा खत्री यांनी पत्र पाठवून विकासकामांबाबत पंधरा दिवसात सूचना सादर करावी अशी मागणी खासदार, तीन मंत्री व चार आमदारांना पाठविले.