
नाशिक : जिल्ह्यात ‘एलडीओ’च्या नावाखाली बनावट डिझेलची विक्री करणाऱ्या केंद्रांच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्या कारवाईवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. प्रयोगशाळेत तपासलेल्या नमुन्यांमध्ये ‘एलडीओ’ नव्हे, तर भेसळयुक्त इंधनच असल्याची माहिती नाशिक जिल्हा पेट्रोल डिलर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विजय ठाकरे यांनी दिली. या प्रकरणी १२ डिसेंबरला पुढील सुनावणी होणार असून, डिलर्स असोसिएशनला आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणार आहे.