Nashik News: शासनाच्या सरसकट मानधनावर कलावंत नाराज! गुणवत्तेनुसार कलावंतांना मानधन मिळण्यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांना निवेदन

Nashik News : राज्य शासनाकडून १९५४-५५ पासून राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना राबविण्यात येत आहे
Artist Remuneration Scheme
Artist Remuneration Schemeesakal

नाशिक : मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सरसकट सर्व कलावंतांना ५ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला असून १ एप्रिल २०२४ पासून या शासन निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. परंतु, आयुष्यभर कलेची सेवा करून, सुवर्णपदके मिळविले आणि हातात चिपळ्या घेऊन रंगमंचावर वावरणाऱ्या कलावंताला सारखेच मानधन मिळणार असल्याने वरिष्ठ आणि ज्येष्ठ कलावंतांचा हा अपमान असल्याची संतप्त भावना कलावंतांनी व्यक्त केली आहे. (Nashik remuneration for artists according to merits marathi news)

राज्य शासनाकडून १९५४-५५ पासून राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीतील वाढती महागाई पाहता लोकप्रतिनिधी, कलावंत, कलाकार संघटनांकडून मानधनात वाढीची मागणी केली जात होती.

आता नवीन निर्णयानुसार वृद्ध कलावंत आणि साहित्यिकांना एकरकमी पाच हजार रुपये मानधन लाभार्थ्यांना डीबीटी प्रणालीव्दारे अदा करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या निकषांनुसार कलावंत व साहित्यिकांना अ श्रेणी ३७००, ब श्रेणी २७००, क श्रेणी २२५० इतके मानधन दिले जात होते.

ही श्रेणी पद्धत रद्द करून सर्वांना सरसकट ५ हजार रुपये मिळणार आहेत. ५० वर्षांवरील कलावंत व साहित्यिकांना हयात असेपर्यंत मानधन मिळणार असून, एकदा कागदपत्रे सादर केल्यानंतर आजीवन कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज नसून केवळ दरवर्षी हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक असणार आहे.

मात्र, या निर्णयाला नाशिक जिल्ह्यातील कलावंतांनी विरोध केला असून अ वर्ग कलाकाराला १० हजार, ब वर्ग ७ हजार आणि क वर्ग ५ हजार रुपये मानधन मिळावी, अशी मागणी ज्येष्ठ कलावंतांकडून होत आहे.

"पालकमंत्र्यांमार्फत सांस्कृतिक मंत्र्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी क वर्गातील कलावंत आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया राबविल्यास ग्रामीण भागातील कलावंत कायमचा दुर्लक्षित राहून योजनेपासून वंचित राहील. त्यासाठी ऑनलाइनबरोबर ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू राहावी."

- सुनील ढगे, उपाध्यक्ष, वृद्ध कलावंत मानधन समिती, महाराष्ट्र शासन

"माझे वय ७० आहे. दर महिन्याला २२५० इतके मानधन मिळते. पण मधुमेह, रक्तदाब आणि ह्रदयरोग असल्याने दर महिन्याला औषधे घ्यावी लागतात. त्या औषधांची किंमत मिळणाऱ्या मानधनापेक्षा अधिक असल्याने किमान १० हजार तरी मानधन मिळावे एवढीच माफक अपेक्षा आहे."- श्रीकांत गायकवाड, लाभार्थी, ज्येष्ठ कलावंत

Artist Remuneration Scheme
Loksabha Election 2024 : राहुल यांच्याविरुद्ध सुरेंद्रन ; भाजपने प्रदेशाध्यक्षांना उतरविले रिंगणात

कलावंतांसाठी असणारे निकष

- वय ५० पेक्षा अधिक असावे तर दिव्यांगांसाठी ४० वर्षे

- १५ वर्षे कला व साहित्य क्षेत्रात सातत्यपूर्ण योगदान असावे.

- वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.

- उपजीविका कलेवरच अवलंबून असणारे कलाकार पात्र

- केंद्र वा राज्य शासनाच्या निवृत्ती वेतनाचा लाभ घेणारा नसावा.

कलाकारांच्या मागण्या

- गुणवत्तेच्या वर्गवारीनुसार मानधन मिळावे

- अर्जाची छाननी प्रक्रिया पारदर्शी व्हावी

- किमान १० हजार रुपये मानधन मिळावे

- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अट शिथिल करावी.

- अर्ज मंजुरीसाठी कोणताही राजकीय हस्तक्षेप नको.

Artist Remuneration Scheme
Nashik Lok Sabha Code of Conduct: आचारसंहितेमुळे शहरावर पाणी संकट! पाण्यासाठी चर खोदण्याचा प्रस्ताव आयोगाच्या कोर्टात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com