

ओझर : येथील पोलिसांनी एक चार गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनासह तिघांना ताब्यात घेत गुन्हा दखल केला असून यात दोन लाख ९६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील जुन्या जानोरीरोड वरील एअरफोर्स कंपाऊंड लगत असलेल्या मंडलिक मळ्याजवळ मंगळवारी सकाळी पावणे बारा वाजता सफेद रंगाच्या मालवाहू गाडीत विनापरवाना निर्दयीपणे चार गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक करताना अढळून आले. (Rescue of 4 cattle being transported for slaughter via Ozar )