स्‍वच्‍छतेसाठी नाशिककरांनी करावे मॉरल पोलिसिंग : राजेश पंडित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramesh Pawar

स्‍वच्‍छतेसाठी नाशिककरांनी करावे मॉरल पोलिसिंग : राजेश पंडित

नाशिक : महापालिका आयुक्‍त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांनी राबविलेले नदी स्‍वच्‍छता अभियान प्रोत्‍साहन देणारे आहे. अभियानातून स्‍वच्‍छतेचा जागर करताना पुढील टप्यांत नाशिककरांनी आपले कर्तव्‍य बजावताना ‘मॉरल पोलिसिंग’ (Moral Policing) करावे. या माध्यमातून अस्‍वच्‍छता करणाऱ्यांना विनंतीपूर्वक जाब विचारताना त्‍यांचे समुपदेशन केल्‍यास मोठा बदल घडलेला दिसेल, असा विश्‍वास नमामि गोदा फाउंडेशनचे संस्‍थापक अध्यक्ष राजेश पंडित यांनी व्‍यक्‍त केला. (Nashik residents should do moral policing for cleanliness Rajesh Pandit Nashik News)

श्री. पंडित म्‍हणाले, की शहर हे शरीराप्रमाणे गृहित धरले तर शरीरातील रक्‍तवाहिन्‍या (Blood vessels) म्‍हणजे शहरातील नद्या आहेत. रक्‍तवाहिन्‍यांमध्ये संसर्ग झाल्‍यास शरीर आजारी पडते. अगदी त्‍याचप्रमाणे नद्या प्रदूषित झाल्‍यास शहराचे स्‍वास्‍थ बिघडते. त्यामुळे शहर निरोगी ठेवायचे असेल तर नद्या स्‍वच्‍छ ठेवणे क्रमप्राप्त आहे. प्रत्‍येक माणूस स्‍वतः स्‍वच्‍छ राहिला व आपले घर, परिसर स्‍वच्‍छ ठेवले तर सकारात्‍मक बदल दिसून येईल. अस्‍वच्‍छता पसरविताना इतरांना त्रास होईल, अशी वर्तणूक केली नाही तर या मोहिमेला प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्षपणे हातभारच लागेल. महापालिका आयुक्‍त रमेश पवार यांनी घेतलेला पुढाकार स्‍वागतार्ह असून, या अभियानाला हवे ते सहकार्य वैयक्‍तिक व संस्‍थेमार्फत केले जाईल. गोदावरीमुळे नाशिक आहे, नाशिकमूळे गोदावरी नाही ही बाब बिंबवताना गोदावरी व सर्व उपनद्यांना प्रदूषणमुक्‍त करण्यात आपण जरूर यशस्‍वी होऊ, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

हेही वाचा: Ramzan : जकातमधून दुर्बल घटक, संस्था, मदरशांना मोलाचे सहाय्य

‘हरित कुंभा’चा आदर्श

महापालिका आयुक्‍त रमेश पवार यांनी राबविलेली मोहीम स्‍वागतार्ह आहे. कुंभमेळ्याच्‍या काळात हरित कुंभ या अभियानाअंतर्गत साधू- संत, विद्वान, शासन, प्रशासन, समाज अशा सर्व घटकांना एकत्र करत केलेली स्‍वच्‍छता मोहीम आदर्श ठरली होती. त्‍याचे सकारात्‍मक परिणाम बघायला मिळाले. यापुढेही अशा स्वरूपाच्या उपक्रमांसाठी सहकार्याची भूमिका असेल.

हेही वाचा: देशात 15 राज्यांमध्ये भारनियमन; महाराष्ट्रास 7 दिवसांपासून दिलासा

मानसिक स्‍वच्‍छतेवर भर

पर्यावरणाची हानी रोखण्याच्‍या दृष्टीने नाशिक प्लॅस्‍टिकमुक्‍त करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. प्‍लॅस्‍टिकचे विघटन होत नसल्‍याने त्‍यावर योग्‍य स्वरूपात प्रक्रिया केली जाते. परंतु, शहरातील अधिकाधिक प्‍लॅस्‍टिक संकलन करण्यासाठी योग्‍य ती व्‍यवस्‍था निर्माण करणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात प्रशासकीय अधिकारी यांची भेट घेत ही संकल्‍पना मांडणार आहोत. तसेच शालेय, महाविद्यालयीन स्‍तरावर व्‍याख्याने व अन्‍य उपक्रम सातत्‍याने राबवत असतो. मानसिक स्‍वच्‍छतेवर सातत्‍याने भर देताना नागरिकांच्या वागणुकीत बदल घडविण्याचा आमचा प्रयत्‍न राहिलेला आहे, असे श्री. पंडित म्‍हणाले.

Web Title: Nashik Residents Should Do Moral Policing Cleanliness Rajesh Pandit Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashiknmcNMC commissioner
go to top