
नाशिक : राज्यात प्रथमच भाजपची बहुमताने सत्ता आल्यानंतर एकीकडे आनंद व्यक्त केला जात असताना दुसरीकडे महापालिकेमध्येदेखील शंभर प्लसचा आकडा गाठण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आखलेल्या रणनीतीमुळे पक्षांतर्गत धुसफुस वाढली आहे. त्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे ज्यांच्या विरोधात आत्तापर्यंत लढावे लागले, त्यांनाच आता पक्षात आणण्यासाठी रेड कार्पेट टाकले जात आहे.