Nashik Police : अपर पोलिस महासंचालकांकडून नाशिकच्या बंदोबस्ताचा आढावा

Nashik News : २० तारखेला मतदान होणार असल्याने पोलिस आयुक्तालयाकडून तैनात बंदोबस्तासह कायदा व सुव्यवस्थेचा आढावा राज्य पोलिस प्रशासन विभागाचे अपर पोलिस महासंचालक डॉ. निखील गुप्ता यांनी घेतला.
Police
Police esakal

Nashik News : नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी २० तारखेला मतदान होणार असल्याने पोलिस आयुक्तालयाकडून तैनात बंदोबस्तासह कायदा व सुव्यवस्थेचा आढावा राज्य पोलिस प्रशासन विभागाचे अपर पोलिस महासंचालक डॉ. निखील गुप्ता यांनी घेतला. सोमवारी (ता.१३) रात्री उशिरापर्यंत आयुक्तालयात याबाबत आढावा बैठक सुरु होती. (review of security of Nashik by Additional Director General of Police)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मतदारसंघाची जबाबदारी अपर पोलिस महासंचालक डॉ. निखील गुप्ता यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. आयुक्तालय हद्दीतील पोलिस बंदोबस्त आणि सज्जता याचा आढावा घेण्यासाठी डॉ. गुप्ता पोलिस आयुक्तालयात सोमवारी (ता.२०) सायंकाळी सातला दाखल होत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाया. (latest marathi news)

Police
Nashik News : लोकसंख्येच्या तुलनेत नाट्यगृह अवघी दोनच! कालिदास कलामंदिर, परशुराम साईखेडकर नाट्यगृहावर भार

मतदानावेळी नेमण्यात आलेला बंदोबस्त, क्षेत्रीय पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती, बाहेरुन दाखल झालेले मनुष्यबळ, मतदानापूर्वी, मतदानावेळी व नंतर ‘इव्हीएम’ची वाहतूक व पोलिस अधिकाऱ्यांची गस्त, वाहने यासंदर्भात डॉ. गुप्ता यांनी आढावा घेतला.

यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी यांच्यासह सर्व सहायक आयुक्त उपस्थित होते.

Police
Nashik News : ड्रग्जप्रकरणातही वैभवची झाली होती चौकशी; कुस्तीपटू लहामगे खून प्रकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com