Nashik Ring Road controversy
esakal
नाशिक : बहुचर्चित नाशिक रिंग रोडच्या (परिक्रमा मार्ग) भूसंपादन प्रक्रियेस अंतरिम स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला (Nashik Ring Road) आहे. गोवर्धन, सारूळ, जलालपूर व राजूर बहुला येथे संपादनापूर्वीची सर्व प्रक्रिया पार पाडावी, असेही निर्देश न्यायालयाने राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यापुढील सुनावणी १ जुलैला होईल. या आदेशामुळे रिंग रोडचा मार्ग प्रशस्त झाला आहे.