.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Nashik Crime News : रेल्वे स्टेशन, बस स्थानक येथील गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची पर्स व दागिने चोरणाऱ्या एक संशयित महिलेला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. नाशिक रोड पोलिसांनी ही कामगिरी केली. आरती विनोद नानवटकर (वय ३२, रा. देवळाली गाव) असे संशयित महिलेचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेवून एक महिला ही प्रवासी महिलांच्या पर्स, दागिने चोरुन नेत असल्याचे प्रकार सुरु होता. याबाबत पोलिस ठाण्यात देखील तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. (police arrest woman who stole jewellery from passengers )