नाशिक: नाशिक रोड परिसरातील निवृत्त न्यायाधीशांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरफोडी करणाऱ्या दोघा सराईत घरफोड्यांच्या मुसक्या नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने आवळल्या आहेत. याच घरफोड्यांनी मुंबई नाक्याच्या हद्दीतही प्राध्यापिकेच्या घरात घरफोडी केल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही घरफोडीतील सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल नाशिक रोड पोलिसांनी जप्त केला आहे. जॉय ऊर्फ भुऱ्या विजय नानाजी (२६), चेतन कैलास सोनवणे (दोघे रा. शरणपूर झोपडपट्टी, नाशिक) असे सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.