Nashik Road Railway Station : नाशिक रोड रेल्वेस्थानकावर बाटली टाका, बक्षीस मिळवा; प्लॅस्टिकमुक्तीसाठी अभिनव उपक्रम
Plastic-Free Drive at Nashik Road Railway Station : नाशिक रोड रेल्वेस्थानकावरील फलाट एकवर बसवलेले 'डिजिटल बॉटल क्रॅश मशिन', जे प्रवाशांना प्लॅस्टिक बाटल्या रिसायकल करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लावत आहे.
उपनगर- नाशिक रोड रेल्वेस्थानकावर सध्या प्लॅस्टिकमुक्तीसाठी तांत्रिक पाऊल उचलले जात आहे. प्लॅस्टिकची रिकामी बाटली मशिनमध्ये टाका आणि बक्षीस मिळवा, असा उपक्रम सध्या राबविला जात असून, फलाट एकवर तसे मशिन बसविण्यात आले आहे.