नाशिक रोड: राखी पौर्णिमेनिमित्त माहेरी जाणाऱ्या दोन महिलांच्या पर्समधून तब्बल पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना शनिवारी (ता. ९) दुपारी नाशिकरोड बसस्थानकात घडली. या वेळी नाशिक रोड पोलिस ठाण्यात बस आणून प्रवाशांची तपासणी करण्यात आली. मात्र काही मिळून आले नाही.