फोटो : B18001
नाशिक रोड : खड्ड्यात अडकलेली चारचाकी.
--
खोदलेल्या खड्ड्यात अडकली चारचाकी
नाशिक रोड, ता.२६ : मुक्तिधाम परिसरात महापालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. सोमाणी उद्यान ते किरण हॉटेलदरम्यान केबलसाठी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कडेला चेंबर तयार करण्यासाठी खड्डे खोदले आहेत. मात्र, या खड्ड्यांजवळ कोणतेही सूचना फलक किंवा इशारा देणारी व्यवस्था नसल्याने सोमवारी (ता. २६) दुपारी चारचाकी खड्ड्यात अडकली. सुदैवाने या घटनेत चालकाला दुखापत झाली नाही. मात्र, या प्रकारामुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे
मात्र, या खड्ड्यांच्या बाजूला वाहनचालकांना सावध करणारे सूचना फलक किंवा पुरेशी इशारा व्यवस्था नसल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सुदैवाने या घटनेत चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, खड्ड्यांजवळ योग्य सूचना फलक आणि सुरक्षिततेची व्यवस्था असती, तर हा प्रकार टाळता आला असता, अशी चर्चा परिसरात होत आहे.
काम सुरू असताना नागरिक आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची, असा सवाल आता उपस्थित होत आहे. शहरात विविध विकासकामे सुरू असताना रस्त्यांवरील खोदकामाच्या ठिकाणी योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यांवर सूचना फलक, बॅरिकेड्स आणि इशारा देणारी व्यवस्था नसल्यास अपघाताचा धोका वाढू शकतो.