शहरातील रस्ते कामे पुर्ण करण्यासाठी मार्च अखेर पर्यंत मुदत

शहरातील रस्ते कामे पुर्ण करण्यासाठी मार्च अखेर पर्यंत मुदत
Published on: 
एन्कर ---------------- शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी मार्चअखेर मुदत कामे ४० टक्के पुर्ण, द्वारका- दत्तमंदिर रस्त्याबाबत आज बैठक सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २ : ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर महापालिका प्रशासनाने सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मंजूर असलेल्या ३० रस्त्यांच्या कामांवर लक्ष केंद्रित केले आहे. आतापर्यंत केवळ ३५ ते ४० टक्के कामेच पूर्ण झाली आहेत. उर्वरित सुमारे ६० टक्के कामे ३१ मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त मनिषा खत्री यांनी दिले आहेत. द्वारका- दत्तमंदिर रस्ता रुंदीकरणाबाबत मंगळवारी (ता. ३) कंत्राटदार व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. ध्वजारोहण सोहळ्यामुळे दुर्लक्षित झालेल्या कामांचा आता आयुक्त मनिषा खत्री यांच्याकडून दैनंदिन आढावा घेण्यात आला. अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता, कार्यकारी अभियंत्यांना दररोज अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले. रस्ते कामांची टप्पानिहाय प्रगती तपासणी, त्रयस्थ संस्थेकडून दर्जा तपासणी, गुणवत्तेत तडजोड केल्यास ठेकेदारांना दंड आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान द्वारका- दत्तमंदिर या जवळपास सहा किलोमीटर लांबीच्या रस्ता रुंदीकरणासाठी २२१ कोटींची निविदा काढण्यात आली आहे. सर्वात कमी दराची निविदा व्ही. पी. सेठी कन्स्ट्रक्शन्स प्रा. लि. कंपनीला देण्यात आली आहे. रस्ता रुंदीकरण करताना ९० टक्के रस्ता अतिक्रमणमुक्त असणे आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आले. दरम्यान, मंगळवारी (ता. ३) आयुक्तांनी ठेकेदार व न्हाईच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून कार्यारंभ आदेश देऊन दिवाळीनंतर काम सुरू केले जाणार आहे. ---------------------------- रस्ते कामांची स्थिती -एकूण कामे: पहिल्या टप्प्यात १२३० कोटींचे एकूण ३० रस्ते. - एकूण खर्च सुमारे १४०० कोटी रुपये. - सध्याची प्रगती- फक्त ४० टक्के कामे पूर्ण. - कामांची डेडलाईन- मार्च २०२७ पर्यंत कामे पूर्ण करण्याचे बंधन. ------------------कोट---------- ध्वजारोहणानंतर आता ३० रस्त्यांच्या कामांवर आमचा फोकस असणार आहे. मार्च २०२७ पूर्वी ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. द्वारका- दत्तमंदिर रस्त्याचे कामही तातडीने सुरू केले जाणार आहे. - मनिषा खत्री, आयुक्त, महापालिका. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.