
Nashik News : शासनाच्या वित्त विभागाच्या निर्देशानुसार ग्रामविकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागाने विकासकामांची देयके अदा करण्यासाठी व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट (व्हिपीडीए) प्रणाली लागू केली आहे. ही प्रणाली जिल्हा परिषदांमध्ये लागू करण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाचे उपसचिव (वित्त) राजेश भोईर यांनी मंगळवारी (ता. १३) जिल्हा परिषदेत येऊन प्रणालीत नेमक्या काय अडचणी आहेत, प्रणाली सुटसुटीत करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बदल याबाबत चर्चा केली. ( Problems in VPDA system will be solved)