नाशिक- महिनाभरात मध्यरात्रीच्या वेळी सिन्नर व घोटी भागातील पेट्रोलपंपांवर दरोडा टाकणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपास गतिमान करत नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने माडसांगवी येथून टोळीला अटक केली. या टोळीत चार युवकांसह एका अल्पवयीनाचा समावेश आहे.