Nashik Rural Police Recruitment : नाशिक ग्रामीणच्या 164 जागांवर होणार पोलिसभरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Recruitment

Nashik Rural Police Recruitment : नाशिक ग्रामीणच्या 164 जागांवर होणार पोलिसभरती

नाशिक : बहुप्रतिक्षेत असलेल्या राज्यभरातील पोलिस भरती प्रक्रियेला अखेर बुधवारपासून (ता.९) सुरूवात झाली आहे. यासाठी येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. राज्यभरात सुमारे १४ हजार जागांसाठी सुरू झालेल्या या पोलीस भरती प्रक्रियेत नाशिक ग्रामीणमध्ये १६४ जागांची भरती केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक ठेवली जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिली. (Nashik Rural Police recruitment will held for 164 posts Nashik News)

राज्यभरातील युवक पोलिस भरतीची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर राज्य शासनाने राज्यात सुमारे १४ हजार जागांसाठी पोलिस भरतीची घोषणा केली आणि युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा रोखण्यात आली होती. मात्र बुधवारपासून (ता.९) राज्यभरातील पोलिस भरतीला प्रारंभ झाला आहे. याअंतर्गत नाशिक ग्रामीण पोलिस दलामध्ये १६४ जागांसाठी भरती होणार आहे.

यापूर्वी नाशिक ग्रामीणमध्ये ४५४ जागांसाठी भरती होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, नव्याने जारी केलेल्या माहितीनुसार १६४ जागांसाठी पोलिस भरतीची प्रक्रिया होणार आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निर्धारित वेळेत अर्ज दाखल झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ही प्रकिया राबविताना पूर्णत: पारदर्शकता राखली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक उमाप यांनी दिली आहे.

हेही वाचा: Nashik : मनमाडच्या कांत परिवाराने तैवान देशात साजरी केली श्री गुरुनानक जयंती

३० नोव्हेंबरपर्यत अर्ज सादर करा

भरती प्रक्रियेची अर्ज नोंदणीची वेबसाइट बुधवारी (ता.९) सुरू झाली आहे. त्यानुसार उमेदवारांना http://policerecruitment2022.mahait.org या वेबसाइटवर येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. कागदपत्रे, शैक्षणिक आर्हता, आरक्षण, परीक्षा शुल्क, प्रत्येक ठिकाणच्या रिक्ता जागांनुसारची भरतीची आहे. यासंदर्भात उमेदवारांना नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या ०२५३-२३०९७०० किंवा ०२५३-२२००४५० या क्रमांकावर संपर्क साधता येईल. तसेच, MahaIT हेल्पलाईन क्रमांक (सकाळी १०.३० ते सायं ०५. ०० या वेळेत) 022-61316418 यावरही संपर्क साधता येईल.

"शासनाने नाशिक ग्रामीणच्या आस्थापनेसाठी ४५४ जागा जाहीर केल्या होत्या. परंतु फेरआढाव्यानंतर १६४ रिक्त जागा भरती प्रक्रियेतून भरण्यात येतील.'

- शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण.

हेही वाचा: Nashik : ZP कार्यकारी अभियंता कंकरेजविरोधात झिरवाळ, खोसकर आक्रमक!

टॅग्स :NashikPolice Recruitment