
नाशिक : गोदाघाटावरून दुचाकी चोरून वाळुंज (छत्रपती संभाजीनगर) येथे जाऊन पत्नीच्या प्रियकराचा खून करणाऱ्या बडतर्फ पोलिस आरोपीला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने दुचाकी चोरीप्रकरणी एका वर्षाच्या कारावासाची शिक्षा व १० हजारांचा दंड ठोठावला आहे. रामेश्वर सीताराम काळे (३६, रा. बाजार वाहेगाव, ता. बदलापूर, जि. जालना) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव असून, त्याचा साथीदार लक्ष्मण ऊर्फ लखन नामदेव जगताप (३३, रा. भगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे. (Sacked policeman jailed for year for using stolen bike in murder )