

नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नदीघाटांची लांबी वाढविण्यासह साधुग्रामच्या विस्तारीकरणासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहेत. पर्यावरण विभागाने गोदावरी नदीपात्रात काँक्रिटीकरणाला बंदी घातली असून, गेल्या २० वर्षांपासून भूसंपादनाचा प्रश्नही प्रलंबित आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काँक्रिटीकरण व विस्तारीकरणाचा घाट घातला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.