Sant Nivruttinath Palkhi : ओठी नाथांचे अभंग, वारकरी झाले दंग! संत निवृत्तिनाथांची पालखी संगमनेरमध्ये दाखल

Nashik News : श्री संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा मंगळवारी पार पडल्यावर पालखीचे प्रस्थान खंबाळेकडे झाले.
Sant Shrestha Shree Nivruttinath Maharaj Palkhi entered Sangamner
Sant Shrestha Shree Nivruttinath Maharaj Palkhi entered Sangamneresakal
Updated on

सिन्नर : तालुक्यातील दातली येथे आबालवृद्ध वारकऱ्यांच्या लक्षणीय सहभागाने उत्साहपूर्ण वातावरणात श्री संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखीचा पहिला रिंगण सोहळा मंगळवारी (ता. २५) पार पडल्यावर पालखीचे प्रस्थान खंबाळेकडे झाले. त्या ठिकाणच्या मुक्कामानंतर पालखी संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुकमार्गे राहाता या ठिकाणी मुक्कामी थांबली आहे. (Saint Nivruttinath palanquin entered Sangamner)

पालखीबरोबर दंग झालेले वारकरी मोठ्या भक्तिभावाने कधी नाचत, तर कधी चालत पंढरपूरच्या दिशेने निघाले. हाती टाळ-मृदंग आणि मुखी संत निवृत्तिनाथ, विठूरायाच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले आहे. विठूरायाच्या भेटीची ओढ असल्याने मजल-दरमजल करीत निघालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर भक्तिभाव ओसंडून वाहताना दिसत आहे.

श्री संत निवृत्तिनाथ महाराज पालखीचे आगमन संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक या गावात बुधवारी (ता. २६) दुपारी चारला झाले. त्या ठिकाणी पालखीने मुक्काम केला. दरम्यान, या मार्गावरून जाताना पालखीतील वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये आणि वाहतूक सुरळीत सुरू राहावी.

यासाठी २८ जूनपर्यंत या मार्गावरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहेत. गुरुवारी (ता. २७) सकाळी सहाच्या सुमारास नांदूरशिंगोटे ते लोणी या मार्गावरून तळेगाव दिघेमार्गे वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द, कासारे, लोहारे या मार्गाने प्रस्थान करणार आहे. त्यानंतर पुढे लोणी पोलिस ठाणे हद्दीतील गोगलगाव (ता. राहाता) येथे पालखी जाणार असून, त्याठिकाणी मुक्कामाला थांबणार आहे. (latest marathi news)

Sant Shrestha Shree Nivruttinath Maharaj Palkhi entered Sangamner
Sant Nivruttinath Palkhi : पंढरीची वारीमध्ये धरला अनेकांनी फेर

असा असेल पालखीचा मार्ग...

राहाता येथील मुक्कामानंतर २७ जून गोगलगाव, २८ जून राजुरी, २९ जून बेलापूर (बु.), ३० जून राहुरी, १ जुलै डोंगरगण, २ जुलै अहमदनगर, ३ जुलै अहमदनगर येथे सकाळी १० ते दुपारी १२ श्री निवृत्तिनाथांचा समाधी सोहळा होईल व मुक्काम अहमदनगर येथेच असेल. ४ जुलै साकत, ५ जुलै घोगरगाव, ६ जुलै मिरजगाव, ७ जुलै कर्जत, ८ जुलै कोरेगाव, ९ जुलै रावगाव, १० जुलै जेऊर, ११ जुलै कंदर, १२ जुलै दगडी अकोले.

१३ जुलै करकंब, १४ जुलै पांढरीची वाडी, १५ जुलै चिंचोली, १६ जुलै वाखरीतून पंढरपूरमध्ये रात्रीचा मुक्काम असेल. १७ जुलैला आषाढी एकादशी साजरी होईल. २० जुलैपर्यंत पालखी सोहळा पंढरपुरात श्री निवृत्तिनाथ मठात मुक्कामी असेल. त्यानंतर गोपाळकाला करून पालखी परतीच्या मार्गाने निघेल.

Sant Shrestha Shree Nivruttinath Maharaj Palkhi entered Sangamner
Sant Nivruttinath Palkhi : असा अनुपम्य रिंगण सोहळा, आज पाहिला म्या डोळा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shri Sant Muktabai Palkhi Sohala
Umesh Ranawade Calls Off Fast After 48-Hour Deadline for Palkhi Honor Decision
Sant Tukaram Maharaj Palkhi departure date 2026
Tradition Meets Pride: Suregaon Bullock Pair Selected for Sant Nivruttinath Rath Ceremony
30 English Keywords
Marathi News Esakal
www.esakal.com