Sakal Reality Check : केविलवाण्या चेहऱ्याची दखल व्‍यवस्था घेईल का? परगावाहून आलेल्‍या उमेदवारांना मनस्‍ताप

Sakal Reality Check : स्‍पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी चारशे-पाचशे किलोमीटर अंतर कापत ते कसेबसे नाशिक गाठतात.
The students who have come to appear for the competitive exams are suffering due to lack of facilities. Due to this students sleeping in the open.
The students who have come to appear for the competitive exams are suffering due to lack of facilities. Due to this students sleeping in the open.esakal

Sakal Reality Check : स्‍पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी चारशे-पाचशे किलोमीटर अंतर कापत ते कसेबसे नाशिक गाठतात. राहायचा- खायचा प्रश्‍न दूरच पण प्रसाधनगृहासाठी वणवण करत फिरण्याची वेळ ओढवते. अशात परीक्षा केंद्र परीसरातील रहिवासी घरांचे दार ठोठावत लाजऱ्या, दबक्‍या आवाजात काका, तुमचे वॉशरुम वापरु का प्‍लीज’, असा प्रश्‍न विचारणाऱ्या उमेदवारांचा केविलवाण्या चेहऱ्याची दखल ही व्‍यवस्‍था कधी घेईल, असा प्रश्‍न पडल्‍यावाचून राहात नाही. ()

करिअर घडविण्यासाठी फक्‍त अभ्यास करणे पुरे नसून, हालअपेष्टा सहन करायची तयारी ठेवणे, हा उमेदवारांचा नाइलाज बनला असल्‍याचे भयावह वास्‍तव ‘सकाळ’च्‍या पाहणीत आढळले. वेगवेगळ्या भरतीसाठी किंवा अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी अशा जवळपास रोजच कुठल्‍या न कुठल्‍या परीक्षा पार पडत असतात.

उपलब्‍ध जागा कमी अन् परीक्षार्थींची संख्या हजारो पटींनी अधिक राहात असल्‍याने परीक्षेचे व्‍यवस्‍थापन करताना प्रशासकीय यंत्रणा, परीक्षा केंद्र असलेल्‍या शैक्षणिक संस्‍थेची तारांबळ उडते आहे. एकंदरीत या व्‍यवस्‍थेत बळी मात्र उमेदवारांचा जात आहे. यापेक्षाही गंभीर बाब म्‍हणजे उमेदवारांच्‍या या हालअपेष्टांबाबत ना प्रशासकीय यंत्रणा संवेदनशील आहे, ना संबंधित शैक्षणिक संस्‍थेकडून सहानुभूतिपूर्वक विचार केला जात असल्‍याचेही पाहणीत आढळून आले आहे.

चारण्याची कोंबडी अन्‌ बाराण्याचा मसाला

काही परीक्षांसाठी तीनशे ते चारशे इतके माफत शुल्‍क आकारले जाते. परंतु उमेदवारांच्‍या वास्तव्‍यापासून खूप लांबच्‍या शहरात परीक्षा केंद्र उपलब्‍ध होत असल्‍याने प्रवास, राहाणे व खाण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो.

एक परीक्षेला सामोरे जाताना सुमारे तीन ते चार हजारांपर्यंत खर्च करावा लागत असल्‍याने ‘चारण्याची कोंबडी अन्‌ बाराण्याचा मसाला’ म्हणीसारखी गत उमेदवारांची होते आहे. त्‍यामुळे परीक्षा शुल्‍क थोडे जास्‍त घ्या, पण वास्‍तव्‍यास असलेल्‍या शहरानजीकचे केंद्र द्या, अशी कळकळीची विनंती केली जाते आहे.

The students who have come to appear for the competitive exams are suffering due to lack of facilities. Due to this students sleeping in the open.
Nashik News : ‘इस्पॅलियर’ च्या विद्यार्थ्यांकडून रिसायकल प्लास्टिक बँण्डची निर्मिती

झाडाच्‍या आडोशाला विश्रांती

परीक्षेसाठी आलेल्‍या विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेपूर्वी केंद्रात प्रवेश नाकारला जातो. त्‍यामुळे त्‍यांना परिसरातीलच मोकळी जागा, मैदान येथील सावली, झाडाखालील आडोशाचा आधार घेत वेळ घालवावा लागतो आहे. बहुतांश वेळा उमेदवारांसोबत त्‍यांचे पालक असल्‍याने, त्‍यांना ठाण मांडून बसावे लागते आहे.

परत परीक्षा द्यायलाच नको..

परीक्षेला सामोरे जातांना येणाऱ्या कटू अनुभवांमुळे अनेक उमेदवार 'पुन्‍हा भविष्यात परीक्षा द्यायलाच नको' अशा मानसिकतेत अनेक उमेदवार येत असल्‍याचे धगधगते वास्‍तव समोर येत आहे. विशेषतः महिला परीक्षार्थींना परीक्षेला सामोरे जातांना होणारी तारेवरची कसरत अडचणीची ठरते आहे.

पाहणीत आढळलेल्‍या बाबी..

- परगावाहून आलेल्‍या परीक्षार्थ्यांना पार करावी लागतेय अडथळ्यांशी शर्यत

- प्रसाधनगृहासाठी रहिवासी परीसरातील घरांचे ठोठवावे लागतंय दार

- बॅग, साहित्‍य सांभाळण्यासाठी नातेवाईक, मित्रांचा आधार

- एकटे आलेल्‍यांकडून परीसरातील नागरिक, व्‍यावसायिकांना बॅग, साहित्‍य ठेवण्यासाठी घातली जातेय गळ

- आधारकार्डसह इतर कागदपत्रांच्‍या झेरॉक्‍सच्‍या मागणीने धावपळ

- काही व्‍यावसायिकांकडून परिस्थितीचा फायदा घेत झेरॉक्‍ससाठी जादा पैशांची आकारणी

- अडगळीच्‍या परीसरातील केंद्रांपर्यंत पोचण्यासाठी परीक्षार्थ्यांची होतेय पायपीट

- सुरक्षारक्षक, तपासणीसांच्‍या मुरोजी स्‍वभावामुळे परीक्षार्थी हवालदिल

- काही ठिकाणी शैक्षणिक संस्‍था, रहिवासी नागरिकांच्‍या असहकार्यामुळे परीक्षार्थ्यांचे होतात हाल

The students who have come to appear for the competitive exams are suffering due to lack of facilities. Due to this students sleeping in the open.
Nashik News: Virtual Reality System खरेदीसाठी दरपत्रकांचा आग्रह! ZPकडून आदेश डावलून खरेदीचा घाट

ऐका परीक्षार्थींचे म्‍हणणे..

प्रज्‍वल पवार (पंढरपूर): परीक्षेसाठी दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये आलो होतो. परीक्षा शुल्‍कापेक्षा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी खूप खर्च होतो. त्‍यामुळे एकतर नजीकच्‍या शहरात केंद्र मिळावे, किंवा केंद्र मिळालेल्‍या शहरात पुरेशा सुविधा मिळणे अपेक्षित आहे.

विशाल शिवदास (कऱ्हाड, सातारा) : माझ्या दहा मित्रांसोबत परीक्षा देण्यासाठी नाशिकला आलो. सकाळ सत्रात मित्र परीक्षेला गेलेले असताना सावलीत ठाण मांडत आम्‍ही त्‍यांचे साहित्‍य सांभाळत आहोत. आता आम्‍ही परीक्षा केंद्रात जाऊ तेव्‍हा मित्र आमचे साहित्‍य सांभाळतील. अशी तडजोड करत आम्‍ही परीक्षेला सामोरे जात आहोत.

अनुप गुप्ता (पंढरपूर) : निर्धारित वेळेतच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात असल्‍याने, त्‍याआधी आलेल्‍या माझ्यासारख्या अनेकांना प्रसाधनगृह वापर, पिण्याचे पाणी यांसाठी गैरसोयीला सामोरे जावे लागते. परीक्षार्थींना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असून, परिस्थितीत बदल व्‍हायला हवा.

पालकांच्‍या प्रतिक्रिया बोलक्‍या..

अजय साबळे (परीक्षार्थीचा भाऊ), चाळीसगाव परीक्षेसाठी सकाळीच आलो होतो. काहीच सुविधा नसल्‍याने झाडाखाली अडगळीच्‍या ठिकाणी आश्रय घ्यावा लागतो आहे. परीक्षार्थी व त्‍यांच्‍या पालकांसाठी किमान सुविधा पुरविणे अपेक्षित असताना प्रत्‍यक्षात तसे होत नाही.

आकाश डगळे (परीक्षार्थीचा मित्र) सिन्नर परीक्षेसाठी मित्रासोबत आलो असताना, अपुऱ्या सुविधांमुळे आमची गैरसोय झाली. पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह अशा कुठल्‍याच सुविधा न मिळाल्‍याने शोधाशोध करावी लागली. ( latest marathi news )

The students who have come to appear for the competitive exams are suffering due to lack of facilities. Due to this students sleeping in the open.
Virtual Reality System : अमेरिकेतून प्राप्त निविदांना ब्रेक ग्रामविकासाच्या नवीन आदेशाचा फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com