SAKAL Special : चालता... बोलता...! कार्यकर्त्यांशी संवाद महत्त्वाचा...

SAKAL Special : राज्यातील सर्वच पक्षांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कंबर कसली आहे.
Shrikant Shinde
Shrikant Shindeesakal

कार्यकर्त्यांशी संवाद महत्त्वाचा...

राज्यातील सर्वच पक्षांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे आज नाशिकमध्ये येत असून आपल्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत.

सध्या राज्यातील युती आघाडीत गट तट पडल्याने उमेदवारांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी मोठी चुरस आहे. त्यामुळे कुठल्या उमेदवाराला कुठलं तिकीट मिळेल ही जरी संभ्रमावस्था असली तरी प्रत्येक पक्षाला युतीत असो, आघाडीत असो की स्वतंत्र असो आपली ताकद आजमावण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज लागणारच आहे.

नाशिक लोकसभेची जागा सध्या युतीतील शिवसेनेकडे आहे, मात्र येणाऱ्या निवडणुकीत नाशिकची जागा कोणाला मिळणार हे अजून स्पष्ट झालेलं नसलं तरी युतीत लढताना निवडणुकीत आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी पक्षाचा पाया असलेला कार्यकर्ता टिकवणे आता सर्वांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

(nashik SAKAL Special chalta bolta Communication with workers is important marathi news)

Shrikant Shinde
Sakal Special : चालता...बोलता...! विज्ञानाचे अनोखे प्रयोग

ऑनलाइनचा तिढा

शिक्षकांना शाळाबाह्य कामे फारच लावली जातात. त्यात आता लोकसभा निवडणुकीचे वारे जोमाने वाहत आहे. त्याचेही काम सांभाळावे लागते. अशा वातावरणात शिक्षण विभागाने तीनदिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण घेतले. दिवसभराच्या प्रशिक्षणानंतर त्यावर आधारित प्रश्‍न विचारण्यात आले.

एका ज्येष्ठ शिक्षिकेला हे काही जमेना. शेवटी तिने डमी शिक्षिका त्यासाठी निवडली. ‘तुमचे सगळे तास मी घेते, पण हे ऑनलाइनचे काम पूर्ण करा’, अशी विनंतीच त्यांनी केली. अखेर एका तासात प्रश्‍नपत्रिका सोडवली अन् दिवसभर बसून राहिल्या. (latest marathi news)

Shrikant Shinde
SAKAL Special : चालता... बोलता...! मागल्या बार भी असे फसवलं होत

चार दिवस सासूचे तर, चार दिवस सुनेचे

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. महायुती असो की, महाविकास आघाडी यांच्या जागा वाटपाचे गुऱ्हाळ सुरू आहे. जागांसाठी दोन्ही आघाड्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

यातच पक्षातंर होऊ लागले आहेत. विरोधी पक्षातील अनेक नेते सत्ताधारी पक्षात जात आहे. यातच काही नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण तापले आहे.

याच पार्श्वभूमीवर दोघा कार्यकर्त्यांमध्ये या राजकारणावर गप्पा रंगल्या होत्या. सत्ताधारी पक्षांच्या राजकारणावर टीका करताना एक कार्यकर्ता चुकीच्या पद्धतीने राजकारण सुरू असून विरोधकांची मुस्कटदाबी सुरू असल्याचे सांगत होता.

दुसरा कार्यकर्ता अरे, सत्ताधारी असले की होते असे. मात्र, विरोधकांचे दिवस येईल. चार दिवस सासूचे आले की, चार दिवस सूनचेही येतात. त्यामुळे त्यांचेही दिवस येतील असे सांगत तो त्यांची समजूत घालत होता.

Shrikant Shinde
SAKAL Special : चालता... बोलता...! ऊर्जा मिळाली, ती किती कायम राहील...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com