
आमचं ठरलं.. लढणारचं...
लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवारीचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. कधी नव्हे ते, उमेदवारीचे सस्पेन्स वाढले आहे. नाशिक लोकसभेसाठी शांतीगिरी महाराज इच्छुक असून त्यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. त्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्या सर्मथकांनी मोठे प्रयत्न केले.
परंतू, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. महायुतीकडून दररोज नवं-नवीन उमेदवारांची नावे येत आहे. त्यामुळे समर्थकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यात, महायुतीकडून, बाहुबली नेत्याचे नाव फायनल असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात होते.
त्यावर बाबाजी भक्त परिवारातील सर्मथक ही आमचं ठरलं.. बाबाजी लढणारचं.. यात काडीमात्र बदल होणार नसल्याचे छातीठोकपणे दावा करून सांगत होता. या चर्चेत एका अभ्यासकाने बाबाजींची मतदारसंघाला कशी गरज आहे हे पटवून दिले. (nashik chalta bolta shantigiri maharaj loksabha election 2024)
मतदान कोणाला करायचे ते पण सांगा
मतदान जनजागृतीची जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर येऊन पडली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना एकत्र करा, त्यांच्याकडून वेगवेगळे उपक्रम राबवून घ्या, पालकांना शाळेत बोलवा, त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा, इतकी सगळी कामे करावी लागतात. शहरातील एका शाळेने पालकांना बोलवले.
त्यांना मतदान कसे करावे, त्यातून लोकशाही कशी बळकट होईल, याविषयी माहिती दिली. आपले सगळे ऐकून घेतले म्हणून शिक्षकही खूश होतात. किमान आपल्या तालुक्यात मतदारांची संख्या वाढेल, अशी माफक अपेक्षा त्यांनी बाळगली असेल.
पण एवढं सगळं झाल्यानंतर मतदारराजाने एक विनंती केली. ‘साहेब, तुम्ही सगळी प्रक्रिया समजून सांगितली. आता मतदान कोणाला करायचे एवढेच सांगा’, अशी विनंतीच त्यांनी केली. आता मतदान कोणाला करायचे, हे आम्ही कसे सांगणार म्हणून कपाळावर हात मारून घेतात, आता बोला! (latest marathi news)
उमेदवारापेक्षा कार्यकर्ते अडचणीत
एकाच गावात दोन पक्षांचे कार्यकर्ते असले, की त्यांना गळाला लावण्यासाठी नेत्यांमध्येच चढाओढ असते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका गावातील कार्यकर्त्याला तालुक्याचे उपाध्यक्षपद बहाल केले. त्याची इच्छा होती की नव्हती हा भाग नंतर; पण आपल्या पक्षाचा कार्यकर्ता फुटला म्हणून दुसऱ्या पक्षाच्या नेत्याने त्याला थेट अध्यक्षपदच बहाल केले.
आता ‘कोणता झेंडा घेऊ हाती’ म्हणून कार्यकर्त्याची अवस्था झाली. उपाध्यक्ष म्हणून लोकांपुढे जावे, तर अध्यक्षपद हातचे गमवावे लागेल. अध्यक्षपद मिळाले म्हणून काम करावे, तर अगोदरच्या पक्षातील लोक नाराज होतील. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे काम करण्यापेक्षा घरी शांत बसलेले बरे. दोन्ही पदे आपल्याच खिशात म्हणून ‘झाकली मूठ सव्वालाखाची’, आता बोला!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.