SAKAL Special : चालता-बोलता! दुचाकीऐवजी पत्नीचा फोटो

SAKAL Special : साहेब, माझी गाडी चोरीस गेली, जेवण करण्यासाठी मी हॉटेलमध्ये गेलो आणि बाहेर गाडीची चोरी झाली, अशी ओरड करत एक जण पोलिस ठाण्यात दाखल झाला.
Bike Theft
Bike Theftesakal

दुचाकीऐवजी पत्नीचा फोटो

साहेब, माझी गाडी चोरीस गेली, जेवण करण्यासाठी मी हॉटेलमध्ये गेलो आणि बाहेर गाडीची चोरी झाली, अशी ओरड करत एक जण पोलिस ठाण्यात दाखल झाला. मला तक्रार द्यायची आहे, असे म्हणत त्याने पोलिसांना माहिती देण्यास सुरवात केली. पोलिसांनीही त्यास प्रतिसाद देत कशी कुठून आणि कधी गाडीची चोरी झाली, अशी माहिती विचारली.

गाडीचा क्रमांक विचारला, त्यास क्रमांक काही सांगता आला नाही. तो मद्याच्या नशेत असल्याचे पोलिसांना जाणवले. त्यांनी त्यास गाडीचा फोटो दाखविण्यास सांगितले. कदाचित त्यावरून दुचाकीचा क्रमांक समजू शकेल, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली. त्यानेही चटकन मोबाईल काढला आणि त्यातील फोटो पोलिसांना दाखविण्यास सुरवात केली.

फोटो बघताच त्याठिकाणी असलेल्या महिला पोलिस आणि अन्य पोलिस थक्क झाले. अहो, आम्ही गाडीचा फोटो मागितलाय तुमच्या बायकोचा नाही. तुम्ही बायकोचा फोटो दाखवत आहात, असे म्हणताच त्या व्यक्तीने ‘सॉरी सॉरी’ म्हणत काढता पाय घेतला, तो परतला नाही. मात्र घडलेल्या प्रकाराने काही वेळ पोलिस ठाण्यात हास्याचे वातावरण निर्माण झाले. कसे कसे लोक येतात, असे म्हणत सुरू असलेल्या चर्चेस पूर्णविराम मिळाला.

(sakal special showing Photo of wife instead of bike)

Bike Theft
SAKAL Special : चालता-बोलता! गडी निघाला एकटा

नको रे बाबा, चर्चा नको...

निवडणुका म्हटले की प्रचार यंत्रणा आलीच. कोणाबरोबर किती कार्यकर्ते आहेत, याचे मूल्यमापन होत असते. रखरखत्या उन्हात झाडाखाली तीन ज्येष्ठ नागरिकांच्या लोकसभेच्या प्रचारासंदर्भात चर्चा रंगल्या होत्या.

एक जण म्हणत होता, की दोन्हीही उमेदवारांकडे सारखीच गर्दी दिसते. दुसऱ्यानेही त्याला तत्काळ होकार दिला. मात्र, फरक आहे. एका उमेदवाराकडे असणारी गर्दी ही ‘अर्थ’पूर्णरीत्या आली. दुसऱ्या उमेदवाराकडे असलेली गर्दी ही ७० टक्के स्वयंस्फूर्तीने दिसत आहे.

तेवढ्यात तिसऱ्याने विचारले, ‘नेमके कुठल्या उमेदवाराबरोबर स्वयंस्फूर्तीने आहे?’ तेवढ्यात तो म्हणाला, ‘नको रे बाबा, चर्चा नको... कुणी ऐकलं तर आपल्याबद्दलच गैरसमज करायचा.’

Bike Theft
SAKAL Special : चालता-बोलता! राज ठाकरे आप्पांसाठी सभा घेतील?

ताकाला जाऊन, गाडगं लपवत नाही

कुठल्याही पक्षाचे नेते सत्तेत असले की ते फॉममध्ये असतात. त्यामुळे नियम, कायद्यांची तमा न बाळगता ते आपला अजेंडा राबवतात. तर झाले असे की, प्रचाराच्या निमित्ताने नाशिकमध्ये आलेले नेते उद्योगांच्या भेटीला जातात. भेट तशी औपचारिक होती, पण आमच्या उमेदवाराला मतदान करा, हे सांगण्यासाठी सर्वांना बोलवले होते.

इकडच्या-तिकडच्या गप्पा मारून झाल्यानंतर भाऊंनी विषयाला हात घातला. माझ्या गळ्यातील मफलर बघून तुम्हाला आश्‍चर्य वाटले असेल. पण ‘ताकाला जाऊन गाडगं लपवणारा’ मी नाही. त्यामुळे थेट सांगतो, की आमच्या उमेदवाराला मतदान करा. पाहिजे ती कामे करून घ्या. आम्ही कामे करतो म्हणजे तुमच्यावर उपकार करत नाही, तर ते आमचे कर्तव्यच आहे.

पण तुम्हीही तुमचे कर्तव्य पार पाडा, म्हणजे आम्हालाही काम करणे सोपे जाईल, असा इशारावजा विनंती त्यांनी केली. यातून ज्यांना काय बोध घ्यायचा, त्यांनी घ्यावा, बाकी मतदार सुज्ञ आहेतच म्हणा!

Bike Theft
SAKAL Special : चालता-बोलता! आम्ही करतोय तेवढे उद्योग पुरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com