Nashik News: ‘सकाळ’ला सर्वोच्च स्थानी पोचविणार! स्नेहमेळाव्यात विक्रेत्यांचा निर्धार

Nashik News : ‘सकाळ’तर्फे गुरुवारी (ता. २२) त्रिमूर्ती चौकातील शुभलक्ष्मी मंगल कार्यालयात वृत्तपत्र विक्रेत्यांचा स्नेहमेळावा झाला.
The editor of Uttar Maharashtra edition Rahul Ranalkar, present at the newspaper seller's meeting organized by 'Sakal' on Thursday.
The editor of Uttar Maharashtra edition Rahul Ranalkar, present at the newspaper seller's meeting organized by 'Sakal' on Thursday. esakal

नाशिक : नाशिककरांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘सकाळ’ वृत्तपत्रास घरोघरी पोचवणे, हेच आमचे मुख्य उद्दिष्ट राहणार असल्याचा निर्धार वृत्तपत्र विक्रेता संघटनांनी व्यक्त केला. विश्वासार्ह बातमी ही ‘सकाळ’ची मोठी ताकद असून, घरातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत ‘सकाळ’ पोचविण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी दिली. (Nashik Sakal get together marathi news)

‘सकाळ’तर्फे गुरुवारी (ता. २२) त्रिमूर्ती चौकातील शुभलक्ष्मी मंगल कार्यालयात वृत्तपत्र विक्रेत्यांचा स्नेहमेळावा झाला. या वेळी ‘सकाळ’ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, महाव्यवस्थापक मदनसिंह परदेशी, उपसरव्यवस्थापक (वितरण) संजय चिकटे, वितरण व्यवस्थापक (पुणे) संजीव पारीक, नाशिकचे वितरण व्यवस्थापक बळिराम पवार, तसेच वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे (सिडको) अध्यक्ष अजय बागूल, सातपूरचे अध्यक्ष राजू अनमोला यांसह वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी ‘सकाळ वाचक वर्गणीदार’ योजनेचा जोरदारपणे प्रारंभ करण्यात आला. डॉ. रनाळकर म्हणाले, की एकविसावे शतक हे माध्यमांचे युग संबोधले जात आहे. सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या युवकांना यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना वाचनाची सवय लावण्याची आवश्यकता आहे. वृत्तपत्र वाचनाने विचारशक्ती वाढते.

सकारात्मक विचारांची पिढी घडावी म्हणून वाचकांसाठी ‘सकाळ’ ने नवीन आकर्षक स्कीम आणली असून त्यात वृत्तपत्र विक्रेत्यांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. अजय बागूल म्हणाले, की वृत्तपत्र विक्रेत्यांचा इतिहास जुना आहे. कोरोनाकाळात अंक घराघरांत पोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम विक्रेत्यांनी केले.

याकाळात वृत्तपत्राची झालेली हानी भरून काढणार आहोत. राज्यातील इतर जिल्ह्यांत मिळालेल्या प्रतिसादापेक्षा नाशिक वरचढ ठरेल. नवा उच्चांक गाठणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. सकाळच्या या योजनेतून वृत्तपत्र विक्रेत्यांना लाभ तर होईलच याशिवाय वाचकसंख्या वाढविण्यासाठी आम्ही पूर्णतः योगदान देणार असल्याचे राजू अनमोला यांनी सांगितले. (Latest Marathi News)

The editor of Uttar Maharashtra edition Rahul Ranalkar, present at the newspaper seller's meeting organized by 'Sakal' on Thursday.
Nashik News : GPO जवळील जलकुंभ बनला टवाळखोरांचा अड्डा; ठिकठिकाणी मद्याच्या बाटल्या

मदनसिंह परदेशी म्हणाले, वृत्तपत्र विक्रेत्यांनी सकाळला नेहमी सहकार्य केले आहे. त्यांच्या बळावर आपण इतक्या वर्षांचा विश्वास संपादन केला. यापुढेही हा विश्वास अजून वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रारंभी चिकटे यांनी प्रास्ताविकातून योजनेविषयी माहिती दिली. या योजनेतून वाचकांना ज्ञानाचा खजिना मिळणार आहे.

वृत्तपत्र विक्रेत्यांनाही अधिकचा रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे घराघरांत हा अंक पोचविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वृत्तपत्र विक्रेत्यांनी केले. अभिजित गरुड यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सातपूर व सिडकोतील वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"‘सकाळ’ची वाचकांसाठी योजना चांगली आहे. मोबाईलचे दुष्परिणाम दिसू लागल्याने त्याचा वापर वाचनासाठी कमी होत आहे. त्यामुळे प्रिंट मीडियाचे स्थान टिकून आहे. वृत्तपत्रात बातमी वाचल्याशिवाय वाचकांना समाधान मिळत नाही. विक्रेते या योजनेला पूर्णपणे प्रतिसाद देतील."

- अजय बागूल, अध्यक्ष वृत्तपत्र विक्रेता संघटना, सिडको

"कोरोनाकाळात कमी झालेला अंक पुन्हा मिळविण्याची ‘सकाळ’ची योजना ही एक मोठी संधी आहे. नवीन योजनेमुळे वाचकांना आर्थिक फायदा होईल. अंक वाढल्याने विक्रेत्यांनाही रोजगार उपलब्ध होईल."- बाळासाहेब सूर्यवंशी, उपाध्यक्ष वृत्तपत्र विक्रेता संघटना, सिडको

"वृत्तपत्र विक्रेता अनेक अडचणींतून पुढे जातो. अत्यंत कष्ट करून वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोचवतो. त्यांच्या रोजगारात वाढ होणे आवश्यक आहे. ‘सकाळ’ने नव्याने आणलेली योजना वाचकांबरोबरच वृत्तपत्रविक्रेते बंधूंनाही फायदेशीर ठरेल."

- राजू अनमोला, अध्यक्ष, वृत्तपत्र विक्रेता संघटना, सातपूर

"सकारात्मक विचारांची पिढी घडवण्यासाठी ‘सकाळ’ ने घेतलेल्या पुढाकारात आम्ही निश्चितपणे सहकार्य करणार आहोत. वाचनाची आवड जोपासायला लावणाऱ्या या उपक्रमात सर्व विक्रेते सहभागी होतील."- सचिन वरंदळ, उपाध्यक्ष, वृत्तपत्र विक्रेता संघटना, सातपूर

The editor of Uttar Maharashtra edition Rahul Ranalkar, present at the newspaper seller's meeting organized by 'Sakal' on Thursday.
Goda Mahaarti : मीच विनविते हात जोडूनी, 2 आरत्या मज करू नका; धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची नाराजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com