Officials of the State Teachers Council while giving a statement to the Group Development Officer Sandeep Viaal regarding the delay in salary verification.esakal
नाशिक
Nashik News : प्राथमिक शिक्षकांच्या वेतन पडताळणीस ठेंगा! 8 वर्षांपासून प्रलंबित
Latest Nashik News : जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत कार्यरत हजारो प्राथमिक शिक्षकांना १ जानेवारी २०१६ ला सातवा वेतन आयोग लागू झाला आहे.
येवला : जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत कार्यरत हजारो प्राथमिक शिक्षकांना १ जानेवारी २०१६ ला सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. तथापि, अद्याप पावेतो ९० टक्के शिक्षकांच्या वेतनाची पडताळणी झालेली नाही. यामुळे शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वेतन पडताळणी करण्यास आठ वर्षांचा अक्षम्य विलंब करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने दिला आहे.

