
नाशिक : शहर, जिल्ह्यात पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात दररोज धडक कारवाई केली जात आहे. विक्रेत्यांना अटक करीत गुन्हे दाखल केले जातात. मात्र, असे असतानाही नायलॉन मांजा विक्री व वापराला पूर्णपणे आळा बसलेला नाही. दररोज जीवघेणा नायलॉन मांजा एकाच्या तरी जिवावर बेततो. पोलिस यंत्रणेकडून होत असलेली कारवाई केवळ नावापुरतीच असल्याने त्याचा धाक निर्माण होत नसल्याचे चित्र आहे.