Nashik News : सप्तशृंगगडावर भेसळयुक्त मिठाई विक्रीचा पर्दाफाश! 5 विक्रेत्यांवर कारवाई

Nashik : सप्तशृंगगडावर रोपवे संकुल परिसरातील पाच विक्रेत्यांकडे भेसळयुक्त मिठाई आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Officials and employees of the Food and Drug Administration while taking action against the sweets sellers here.
Officials and employees of the Food and Drug Administration while taking action against the sweets sellers here.esakal

Nashik News : सप्तशृंगगडावर रोपवे संकुल परिसरातील पाच विक्रेत्यांकडे भेसळयुक्त मिठाई आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अन्न व औषध विभागाच्या पथकाने पाच विक्रेत्यांकडून पाच लाख ८३ हजार ८०० रुपये किमतीचा एक हजार ९४४ किलो हलवा जप्त केला आहे. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या या प्रकाराचा पर्दाफाश करण्यात आल्यामुळे या कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे. (Sale of adulterated sweets exposed at Saptshringigad )

जप्त करण्यात आलेला काही साठा मुदतबाह्य व नाशवंत असल्याने सप्तशृंगगडावरील ग्रामपंचायतीच्या कचरा डेपोमध्ये नष्ट करण्यात आला. याप्रकरणी घेतलेले नमुने विश्‍लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, अहवाल आल्यावर कायद्यानुसार उल्लंघनाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

अन्न व औषध प्रशासनाने अचानक छापे टाकून तपासणी केली असता, सप्तशृंगगडाच्या रोपवे संकुल परिसरात ग्राहकांची दिशाभूल करून मावा पेढे, कंदी पेठे, मलाई पेढे व कलाकंद पेढे दुग्धजन्य पदार्थांपासून तयार केले असल्याचे भासवून हलवा, कलांकद, स्पेशल बर्फी व इतर तत्सम पदार्थ विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे या व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त सं. भा. नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक आयुक्त उ. सि. लोहकरे, म. मो. सानप यांच्या उपस्थितीत नाशिकचे अन्नसुरक्षा अधिकारी योगेश देशमुख, गो. वि. कासार, पी. एस. पाटील, अ. उ. रासकर, उ. रा. सूर्यवंशी, श्रीमती एस. डी. महाजन, नमुना सहाय्यक विकास विसपुते, सचिन झुरडे, विजय पगारे यांनी कारवाई केली.

''धार्मिकस्थळी पेढे, बर्फी, मिठाई खरेदी करताना भाविकांनी ते दुधापासून बनविले असल्याबाबत खात्री करूनच खरेदी करावी. भेसळयुक्त अन्न पदार्थासंदर्भात तक्रार, तसेच गोपनीय माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनास त्वरित संपर्क साधावा.''- सं. भा. नारागुडे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com