Nashik Plastic Ban : बंदी असूनही प्लॅस्टिकची सर्रास विक्री; 145 किलो प्लास्टिक जप्त

Nashik News : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राबविलेल्या मोहिमेत ५७ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सव्वा तीन लाख रुपये दंड वसुल करण्यात आला तर १४५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
Plastic Ban
Plastic Ban esakal

Nashik News : राज्यात प्लॅस्टिक बंदी असतानाही शहरात मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची बाब उघड झाली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राबविलेल्या मोहिमेत ५७ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सव्वा तीन लाख रुपये दंड वसुल करण्यात आला तर १४५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. (Nashik sale of plastic despite ban 145 kg plastic seized)

शहरात प्लॅस्टिक बंदी अंमलबजावणी सक्षमपणे होत नसल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिका आयुक्तांकडे तक्रारी स्वरूपात पत्र पाठविले होते. या पत्राची दखल घेत मनपा आयुक्तांकडून घनकचरा विभागाचे कान टोचण्यात आले. त्यानंतर प्लॅस्टिक विक्री शोधण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आले.

मागील पंधरा दिवसात ४९१ दुकानांमध्ये तपासणी करण्यात आली. सिंगल युज प्लास्टिक वापरणारे ५७ विक्रेते आढळले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून सव्वा तीन लाख रुपये दंड वसुल करण्यात आला तर १४५ किलो बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. पथकाकडून सिडको विभागात सात, पंचवटीत तीन तर सातपूर विभागात सहा व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. (latest marathi news)

Plastic Ban
Nashik News : गाळाने भरलेल्या नांदूरमध्यमेश्वर धरणाकडे दुर्लक्ष

विभागनिहाय कारवाई व दंडवसुली

विभाग केसेस दंडवसुली

सिडको ७ ३५,०००

पूर्व २० १,००,०००

नाशिक रोड १५ ७५,०००

पश्चिम ६ १५,०००

पंचवटी ३ ३०,०००

सातपूर ६ ३०,०००

------------------------------------

एकूण ५७ ३,२५,०००

Plastic Ban
Nashik Onion News : जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांची चौकशी; बेकायदा लिलावचा आरोप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com