Saptashrungi Devi Chaitrotsava : सप्तश्रृंग गडावर आदिमायेच्या चैत्रोत्सवाचे वेध; गडावर 10 लाख भाविकांच्या हजेरीचा अंदाज

Saptashrungi Devi : आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगड गडावर आदिमायेच्या वर्षातील दोन प्रमुख यात्रोत्सवापैकी एक व खानदेशवासियांच्या दृष्टीने प्रमुख असलेला चैत्र यात्रोत्सव आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे.
In the background of Chaitrotsavam, Kunku, Prasad shop set up at Saptshring Fort...
In the background of Chaitrotsavam, Kunku, Prasad shop set up at Saptshring Fort...esakal

Saptashrungi Devi Chaitrotsava : आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगड गडावर आदिमायेच्या वर्षातील दोन प्रमुख यात्रोत्सवापैकी एक व खानदेशवासियांच्या दृष्टीने प्रमुख असलेला चैत्र यात्रोत्सव आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. सप्तशृंगी गडावरील व्यावसायिकांच्या दृष्टीने अर्थकारणाची संधी म्हणून उत्सव असल्याने गडावरील व्यावसायीक दुकानात आवश्यक विविध वस्तूंची खरेदी व खरेदी करून आणलेले साहित्य दुकानात थाटण्यासाठी सरसावले आहे. (nashik Saptashrungi Devi Observance of Chaitrotsav of Adimaya at Saptashrungi Fort marathi news )

खानदेशाची माहेरवासीन समजल्या जाणाऱ्या सप्तश्रृंगी देवीचा चैत्र र्पौणिमा अर्थात १६ ते २३ एप्रिलपर्यंत यात्रोत्सव होणार आहे. चैत्रोत्सवासाठी खानदेशासह नाशिक जिल्ह्यातील लाखो भाविक चैत्र पौर्णिमेच्या पूर्वसंध्येपर्यत श्री सप्तशृंगी गडावर हजेरी लावतात. अनेक कुटुंबात उद्यापासून या उत्सवाला गुढीपाडवा ते श्री राम नवमीपर्यत श्री अन्नपूर्णा नवरात्रोत्सव म्हणूनही आध्यात्मिक महत्व आहे.

१० लाख भाविकांची अपेक्षा

दरम्यान या सात दिवसांच्या कालावधीत किमान दहा लाख भाविक उपस्थित राहतात. त्या दृष्टीने सप्तशृंग गडावर प्रशासनाने नियोजन आखले आहे. दरम्यान गडावर सर्वसाधारणतः अडीचशे ते तिनशे व्यावसायिक विविध प्रकाराचे व्यवसाय करतात. मात्र, यात्रा कालावधीत बाहेरील व्यावसायीक त्याच पटीने येत असल्याने व्यावसायिकांची संख्या पाचशेच्या पुढे जाते. नारळ, हार, फुले, प्रसाद, देवीचे फोटो, खेळणी, साड्या, पेढे, पादत्राणे, बांगड्या, हळद, कुंकू, चुनरी या व अशा अनेक प्रकाराच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर विकल्या जातात. (latest marathi news)

In the background of Chaitrotsavam, Kunku, Prasad shop set up at Saptshring Fort...
Saptashrungi Devi Mandir News: सुरत येथील भाविकाचे आदिमाया सप्तशृंगीस 6 किलो चांदीचे दागिने अर्पण

दरम्यान,यात्रोत्सव आठवड्यावर येऊन ठेपल्याने व्यावसायिकांना जागा आरक्षित करणे, दुकानाची मांडणी करण्यासाठी पूर्वतयारीचे वेध लागले आहेत. हे सर्व नियोजन आखताना खरेदीसाठी व्यावसायिकांनी गती दिली आहे. यात्रोत्सव कालावधीत गडावर पेढ्यांची विक्री प्रसाद रुपात मोठ्या प्रमाणावर होते. जवळपास शंभरावर पेढे विक्रेते गडावर हा व्यवसाय करतात. धाराशिव जिल्ह्यातील पाथरुड येथून हे पेढे गडावरील व्यापारी खरेदी करतात.

वस्तू खरेदीला वेग

प्रसादासाठी साखर फुटाणे, रेवड्या, खडीसाखर, लाह्या, मुरमुरे, फुटाणे हे बहुतांश व्यावसायिक नाशिक येथून खरेदी करतात. मालेगाव येथून साड्या, शालू, पैठणी यांची खरेदी केली जाते. हळद, कुंकू पंढरपूर येथून खरेदी केले जाते. नारळ आंध्र प्रदेश येथून घाऊक स्वरुपात खरेदी केले जातात. बांगड्या, शोभेचे हार, खेळणे व विविध वस्तू मुंबई येथून खरेदी करण्यात येतात. गुजरात राज्यातून विविध रंगाच्या चुनरी, नाशिक जिल्ह्यातील विविध भागातील फुलांचे हार, तर हॉटेल्ससाठी वस्तू नाशिक, वणी, कळवण येथून खरेदी जोरात सुरु आहे.

यात्रोत्सवातील प्रमुख दिवस

आदिमायेच्या चैत्रोत्सवातील शेवटचे तीन दिवस म्हणजेच त्रयोदशी, चतुर्दशी (खानदेशात चावदस असे म्हणतात) या दिवशी लाखो पद यात्रेकरु गडावर दाखल होतात. या तीन दिवसांच्या गर्दीवर व्यावसायिकांची मोठी आर्थिक उलाढाल होते. संपूर्ण चैत्र महिन्यात नवसपूर्तीच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. इतर कालावधीपेक्षा चैत्रोत्सव व्यावसायिकांच्या दृष्टीने आर्थिक पर्वणीच असते.

In the background of Chaitrotsavam, Kunku, Prasad shop set up at Saptshring Fort...
Saptashrungi Devi Chaitrotsava 2023 : चैत्रोत्सवामध्ये 23 देशांतील 56 विदेशी पाहुणेही सहभागी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com