Nashik News : लायब्ररी ऑन व्हिलमधून सावानाची तिसरी शाखा! गुढीपाडव्याला उद्घाटन

Nashik News : आता मराठी नवीन वर्षात सार्वजनिक वाचनालयाची तिसरी नवीन शाखा इंदिरानगर भागात सुरू होत आहे.
Sarvajanik Vachnalay Nashik
Sarvajanik Vachnalay Nashikesakal

नाशिक : गेल्या सात वर्षांपासून लायब्ररी ऑन व्हील योजना बारगळलेली असताना सार्वजनिक वाचनालयाने डिसेंबर २०२३ मध्ये अखेर प्रायोगिक तत्त्वावर लायब्ररी ऑन व्हील अर्थात फिरते वाचनालय सुरू केले. शहरातील विविध भागांत फिरते वाचनालय सुरू केल्यानंतर या अभियानाला इंदिरानगर भागातून सर्वाधिक सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्याच पार्श्वभूमीवर आता मराठी नवीन वर्षात सार्वजनिक वाचनालयाची तिसरी नवीन शाखा इंदिरानगर भागात सुरू होत आहे. (Nashik sarvajanik vachnalay third branch from Library on Wheel news)

सार्वजनिक वाचनालयाचे वाचक, सभासद शहरातील विविध भागांत विखुरलेले आहेत. पुस्तक घेण्यासाठी वा बदलण्यासाठी बरेच अंतर पार करून त्यांना वाचनालयात यावे लागते. त्यात हवे असलेले पुस्तक न मिळाल्यास वाचकांचा हिरमोड व्हायचा. यामुळे वाचनालयाने लायब्ररी ऑन व्हील या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला सुरवात केली आहे.

एका ठराविक दिवशी तारीख-वेळ वाचकांना कळविली जाते. त्यानुसार चार-पाच किलोमीटर परिसरात राहणारे वाचक पुस्तक घेण्यासाठी लायब्ररी व्हॅनजवळ येतात आणि हवे असणारे पुस्तक घेऊन जातात. त्यांना हवे असणारे पुस्तक वाचनालयात कळविल्यावर ते पुस्तक व्हॅनमध्ये उपलब्ध करून देण्यात येते.

त्यामुळे वाचकांना घरपोच पुस्तक मिळतात. योजनेला इंदिरानगर भागात अधिक प्रतिसाद मिळाल्याने तेथील रहिवासी अविनाश बल्लाळ यांनी स्वत:च्या बंगल्यात वाचनालयासाठी एक खोली उपलब्ध करून देत वाचनालय सुरू करण्याची मागणी सावानाकडे केली होती. (latest marathi news)

Sarvajanik Vachnalay Nashik
Nashik Lok Sabha: जिल्ह्यातील खासदारास पहिल्यांदाच मिळाला केंद्रीय मंत्रीपदाचा मान! कहांडोळे, चव्हाण लाल दिव्यापासून वंचित

त्यानुसार एप्रिल महिन्यात जागतिक पुस्तक दिन असल्याने शिवाय मराठी नवीन वर्षाची सुरवात सार्वजनिक वाचनालयाच्या नवीन शाखेने होत असल्याने इंदिरानगर भागात राहणाऱ्या वाचकांना वाचनालय घराजवळ उपलब्ध होणार आहे. सावानाची मुख्य शाखा नेहरू गार्डनजवळ तर, गंगापूर रोड येथील गो. ह. देशपांडे उद्यानात वाचनालयाची दुसरी शाखा आहे.

दरम्यान, सार्वजनिक वाचनालयाची तिसरी शाखा सुरू होत असल्याने आता लायब्ररी ऑन व्हील इंदिरानगर भाग वगळून शहरातील इतर भागात नेण्याची संधी मिळणार आहे. व्हॅनसाठी येणारा खर्च इतर भागात खर्च करता येईल व तेथील वाचकांचा असणारा प्रतिसाद पडताळून बघता येणार आहे.

"लायब्ररी ऑन व्हिलला शहराच्या कोणत्या भागात कसा प्रतिसाद मिळतोय तसेच जागा उपलब्ध करून देणारे दानशूर मिळाल्यास वाचनालयाची शाखा सुरू करण्यास हरकत नाही. पंचवटी भागात फारसा प्रतिसाद मिळाला नाही, पण इंदिरानगर भागात वाचकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला."-प्रा. दिलीप फडके, अध्यक्ष सावाना

:सध्या इंदिरानगर येथे सुरू होणाऱ्या वाचनालयात कपाट नेण्याचे काम सुरू आहे. तेथील सभासदांच्या पुस्तकांची आवड लक्षात घेता ७००-८०० पुस्तक उपलब्ध करून दिली आहेत. तसेच नवीन पुस्तकांच्या खरेदीचे काम सुरू असून तिथे अनुभवी सेवकाची लवकरच नियुक्ती करणार आहे.: -देवदत्त जोशी, प्रमुख सचिव, सावाना

Sarvajanik Vachnalay Nashik
Loksabha Election 2024 : निवडणूक संपेपर्यंत कारवाई होणार नाही ; थकबाकीप्रकरणी प्राप्तिकरचा काँग्रेसला दिलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com