

नाशिक : द्वारका चौफुलीवरील उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातानंतर शहर वाहतूक शाखेतर्फे बेशिस्त वाहनचालकांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मागील दोन आठवड्यात एक हजार बेशिस्तांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. यात सर्वाधिक कारवाई विरुद्ध दिशेने वाहन चालविणे आणि सिग्नलचे पालन न करणाऱ्यांचा समावेश आहे. द्वारका चौफुलीवरील उड्डाणपुलावर १२ तारखेला रात्री भरधाव जात असलेला छोटा टेम्पो सळींनी भरलेल्या ट्रकवर पाठीमागून जाऊन धडकला होता.