
इगतपुरी : शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक संचमान्यतेबाबत १५ मार्च व कंत्राटी शिक्षक भरतीबाबतचा ५ सप्टेंबरचा शासन निर्णय वाडी-वस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने हे दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत, या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा २५ सप्टेंबरला बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्याचा निर्धार पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. (School closure march on 25th to cancel unfair decision on slum students)