Campaign to Identify School Dropouts in Nashik : नाशिक महापालिकेच्या शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेदरम्यान वीटभट्टी व स्थलांतरित वस्त्यांमधील ११२ मुले शोधण्यात आली; त्यांना शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला.
नाशिक- महापालिकेकडून दरवर्षी शालाबाह्य मुलांचा शोध घेतला जातो. यंदा राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये ११२ शालाबाह्य मुले आढळून आली आहेत. पुन्हा विद्यार्थ्यांची गळती होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने मासिक ट्रॅकिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.