भंगार गोदामास आग लागून सुमारे २५ लाखाचे नुकसान

भंगार गोदामास आग लागून सुमारे २५ लाखाचे नुकसान
Published on: 
OLN26A15167 नाशिक : तिगरानिया रस्त्यावरील भंगाराच्या गोदामाला गुरुवारी लागलेली आग ----------------- गोदामास लागलेल्या आगीत लाखोंचा भंगार माल खाक सकाळ वृत्तसेवा जुने नाशिक, ता. ५ : तिगरानिया रस्ता वीज वितरण कार्यालयामागील भंगाराच्या गोदामाला गुरुवारी (ता. ५) सकाळी आग लागली. यात सुमारे २५ लाखांचे विविध प्रकारच्या भंगार वस्तूंचा साठा जळून खाक झाला. सुदैवाने जीवितहानी टळली. मोबीन शेख यांचे तिगरानिया हे गोदाम आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन मुख्यालय दोन, पंचवटी विभाग, पंचवटी केंद्र, सिडको, सातपूर आणि नाशिक रोड असे सात बंब घटनास्थळी दाखल झाले. लिडिंग फायरमन सोमनाथ थोरात, उदय शिर्के, फायरमन साहिल जाधव, वृषभ हिरवे, मंगेश जाधव, शुभम मोरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी गोदामाच्या चारही बाजूंनी पाण्याचा मारा करत सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने हवेत आगीचे लोळ उंच उठताना दिसत होते. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. प्लास्टिक वस्तू, रबर, टायर, तेलाचे डबे आणि फर्निचर असा सुमारे २५ लाखांचा भंगार वस्तूंचा साठा जळून नुकसान झाले. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. अग्निशमन विभागात नोंद करण्यात आली आहे. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.