
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी (ता.२९) दुपारी तीनपर्यंत अखेरची मुदत होती. यामुळे निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी समर्थक कार्यकर्त्यांसह रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या परिसरात वाहतूक कोंडीमुळे चक्का जाम झाला. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविली असली तरी त्या मार्गांवरही चक्का जाम होऊन सर्वसामान्यांना वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागला. ( second day in traffic jams disrupted traffic on Tinder CSB MG Road and Saharanpur Road )