
Nashik Godavari Flood : तीन दिवसांपासून पावसाची संततधार कायम असल्याने गोदावरी नदीला या हंगामातील दुसरा पूर आला. महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून रात्रीपासूनच गोदाकाठच्या नागरिक व व्यावसायिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सततच्या पावसामुळे जीवित व वित्तहानी झाली नाही, मात्र नाशिककरांचे जनजीवन विस्कळित झाले. शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण शनिवारी ९७ टक्के भरले. ( Second floods of Godavari disrupts life of citizen)