Nashik News : वसाकाची सुरक्षा 3 कर्मचाऱ्यांवर! कोट्यवधींची मालमत्ता धूळखात, जंगली प्राण्यांचा वावर

Nashik News : करोडो रुपयांची मालमत्ता असलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना गेल्या वर्षापासून बंद आहे.
closed Vasantdada Sugar Factory in Devla taluka.
closed Vasantdada Sugar Factory in Devla taluka.esakal

देवळा : करोडो रुपयांची मालमत्ता असलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना गेल्या वर्षापासून बंद आहे. आसवणी प्रकल्प, सहवीज निर्मिती प्रकल्प आणि पूर्ण कारखाना अशी आजमितीला ५०० कोटींची मालमत्ता धूळखात आहे.

परिसरात प्रकाशयोजना नसल्याने जंगली श्‍वापदे, माकडे व इतर जनावरांचा अधिवास वाढला आहे. अशा परिस्थितीत केवळ तीन सुरक्षा कर्मचारी कारखान्याच्या सुरक्षेसाठी उभे असतात. त्यामुळे मालमत्तेच्या सुरक्षेवरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. (Nashik Security of vasantdada patil on 3 employees Property worth crores in dust wild animals on loose marathi news)

शिखर बँकने थकित कर्जाच्या वसुलीसाठी वसाका कारखान्यांची मालमत्ता जप्त केली आहे. परंतु, या कारखान्याच्या साधन साहित्याच्या सुरक्षेसाठी पुरेशी सुरक्षायंत्रणा तैनात नसल्याचे चित्र आहे. तीन युनिट्स व इतर यंत्रणा सांभाळायला एका शिफ्टकरीता फक्त तीनच सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. त्यांच्याजवळ स्वतःचा जीव वाचवण्यासाठीही पुरेशी सुरक्षायंत्रणा नाही. अशा परिस्थितीत ते कारखान्याची सुरक्षा कशी पार पाडणार. जंगली जनावरांचा बंदोबस्त कसा करतील, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कारखान्यांची मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी नेमकी कोणाची नियुक्ती केलेली आहे, सध्या वसाकाचे अवसायक कोण आहेत, हेच सभासदांना माहिती नाही. कारखान्याच्या मेन गेटवर केवळ दोन-तीन सुरक्षा कर्मचारी आहेत. ते प्रामाणिकपणे प्रवेशद्वाराची राखण करताना त्यांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे.

कारखान्याच्या आसवनी प्रकल्पात गेल्या कित्येक दिवसांपासून वास्तव्यास असलेले बिबटे तसेच, जंगली माकडे फिरताना दिसतात. त्यामुळे कारखाना ओसाड अवस्थेकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र आहे. कसमादेचे वैभव असलेला हा वसाका असा बंद न ठेवता तो चालू व्हावा, त्याची चाके फिरती असावीत, अशी मागणी सर्वांचीच आहे. . (latest marathi news)

closed Vasantdada Sugar Factory in Devla taluka.
Nashik Water Crisis: माणिकपुंज धरणातील पाइपलाइनचे जाळे तोडले! नांदगाव तहसिलदारांची धडक कारवाई

भिंतीला भगदाड

कधीकाळी कसमादेचे वैभव असलेला वसाका परिसर अवैध धंदे व चोऱ्यामुळे चर्चेत आला आहे. यावर्षी धाराशिव प्रशासनाने कारखाना सुरू करण्यासाठी असमर्थता दर्शविली. त्यामुळे कारखाना परिसरात शुकशुकाट असतो. अपुरी सुरक्षा यंत्रणेमुळे कारखाना परिसरात वाळुची तस्करी व अवैध धंद्यांसह कारखान्याच्या आवारात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन सामुग्री चोरी जात आहे.

दोन-तीन महिन्यांपूर्वी कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातील १७ मेगावॅट क्षमतेच्या जनित्रामधून ऑइलचोरी झाल्याचे उघडकीस झाले होते. त्यासाठी अज्ञात भामट्यांनी जनित्राच्या आउटलेटकरीता वापरला जाणारा पाईप १०० मीटर दुरवर नेऊन संरक्षक भिंतीला भगदाड पाडून चोरी केली होती.

"ज्यांना वसाका २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला. त्यांनी कारखाना जेमतेम तीन-चार वर्षे तोही कधी चालू, तर कधी बंद असा चालवला. त्यामुळे कामगारांनाही त्यांच्या हक्काचे पगार व शासकीय भरणा न करता कामगार संघटनेशी झालेल्या कराराचे उल्लंघन करून ते वसाका सोडून गेले. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांवर अवसायक म्हणून सह्या करण्याचे अधिकार सटाणा सहाय्यक निबंधकांना द्यावेत."

- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना

"२८ हजार सभासद असलेल्या वसाकाची करोडोंची मालमत्ता धूळखात आहे. येथील सुरक्षायंत्रणा कोलमडली आहे. पुन्हा एकदा कारखाना सुरू करण्यासाठी उस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कारखाना सुरू करण्यासाठी लढा उभा केला पाहिजे."

- रामकृष्ण जाधव, उस उत्पादक, भादवण

"वसाका बंद अवस्थेत असल्याने कारखान्याची वाताहत होत आहे. कामगारांची मागील देणी अद्याप मिळालेली नाहीत. पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्याने कारखान्याचे भवितव्य धोक्यात आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून वसाका चालू होणे ही काळाची गरज आहे."

- विलास सोनवणे, अध्यक्ष, मजदुर युनियन

closed Vasantdada Sugar Factory in Devla taluka.
Nashik Humanity News: भीषण दुष्काळातही वाहतोय माणुसकीचा झरा! खामखेड्याच्या शेतकऱ्याकडून 300 जनावरांसाठी पाण्याची सुविधा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com