नाशिक- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत महापालिकेकडून क्षयरोग शोधमोहीम राबविण्यात आली. त्यात मागील तीन महिन्यांत ७६५ नवे रुग्ण आढळून आल्याने उपचार घेत असलेल्या क्षयरोग रुग्णांची संख्या दोन हजार ८५८ वर पोहोचल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागात खळबळ उडाली आहे.