
Nashik News : शाळेच्या परिसरात वा इतर ठिकाणी विद्यार्थिनी, महिलांची छेडछाड करणाऱ्यांची माहिती तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दामिनी, निर्भया पथक किंवा पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना कळवावी, असे आवाहन म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अतुल डहाके यांनी केले. म्हसरूळ शिवारातील कर्मवीर ए. टी. पवार माध्यमिक विद्यालय, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. (Senior Inspector Dahake statement of Report molestation to police immediately)